Arogya Vibhag Bharti Group C & Group D New Update | आरोग्य विभाग भरती ग्रुप क आणि ग्रुप ड ची परीक्षा रद्द

arogya vibhag bharti 2022 : आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये झालेला गोधळ आणि संतापलेले परीक्षार्थी यांचा विचार करता ग्रुप क आणि ग्रुप ड ची आरोग्य विभाग भरती रद्द करण्यात आली आहे. पेपरफुटीनंतर जे वादग्रस्त वातावरण निर्माण झाले यामुळे अखेर शासनाने आरोग्य भरती ग्रुप क आणि ग्रुप ड ची भरती रद्द केली आहे. परीक्षा आता नव्याने घेण्यात येणार आहे, त्यासाठी यापूर्वीच्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे विभागामार्फत नमूद करण्यात आले.

Arogya Vibhag Bharti Group C & Group D New Update

आरोग्य भरतीची नवीन जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल, त्यामध्ये जे उमेदवार अर्ज करतील म्हणजेच ज्यांनी रद्द झालेल्या परीक्षेत अर्ज केलेले नाही, अश्या उमेदवारांना मात्र परीक्षा शुल्क भरावी लागणार आहे. सार्वजनिक आरोग्यविभागामार्फत ग्रुप क आणि ग्रुप ड साठीच्या परीक्षा २४ ऑक्टोबर २०२१ व ३१ ऑक्टोबर दिवशी घेण्यात आल्या होत्या. परंतु या दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व्हाट्सअँपवर वायरल झाल्यामुळे पेपरफुटी प्रकरण उघडकीस आले. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून पुणे सायबर पोलिसाकडे तक्रारसुद्धा नोंदविण्यात आली होती.

Arogya Vibhag Bharti latest news

आरोग्य विभागामार्फत तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर तातडीने पुणे पोलीस दलाने मोठ्या ताकतीने या प्रकरणाचा तपास करून पेपरफुटीतील मुख्य आरोपी आणि आरोग्य विभागाचा सहसंचालक डॉ.महेश बोटले यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारी, शिक्षक, एजन्ट याना अटक केली होती. त्याप्रकरणापासून ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी उमेदवारांकडून करण्यात येत होती. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या अव्वर सचिव अर्चना वालझाडे यांनी बुधवारी जाहीर केला आहे.

See also  महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021: ऑनलाइन आवेदन | एप्लीकेशन फॉर्म