Beej Bhandwal Yojana Maharashtra | बीज भांडवल कर्ज योजना अर्ज सुरु

Beej Bhandwal Yojana : शासनामार्फत बेरोजगार युवकांसाठी विविध योजना राबविल्या जातात, ज्यामधील एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच बीज भांडवल कर्ज योजना. या योजनेअंतर्गत युवकांना किंवा लाभार्थ्यांना मर्यादित कालावधीसाठी बीज भांडवल देऊ करून नवीन व्यवसाय उभारणीसाठी अर्थसहाय्य केले जाते. अश्याच एका जिल्ह्यासाठी beej bhandwal yojana चालू झालेली आहे, त्यासंदर्भात अतिशय रीतसर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

योजनेचे नावबीज भांडवल योजना महाराष्ट्र २०२२
कमाल कर्जमर्यादारु ५.०० लाख
कोणासाठीअनुसूचित जातीतील चर्मकार समाज
शेराअर्जदार महामंडळ, बँकेचा, वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले असल्यास प्राधान्य

बीज भांडवल कर्ज योजना beej bhandwal karj yojana in marathi

संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय विशेष घटक (अनुदान योजना) योजनेअंतर्गत बीज भांडवल कर्ज योजनेसाठी कर्जप्रस्ताव अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती वृतपत्रामध्येसुध्दा प्रकाशित करण्यात आली आहे.

सन २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठी संत रोहिदास चर्मउद्योग विकास महामंडळ मर्यदित जिल्हा कार्यालयाकडून अनुदानापोटी उद्दिष्ट ४० व बीजभांडवल योजना उद्दिष्ट १६ प्राप्त झाली असल्याची माहिती संबंधित कार्यालयामार्फत देण्यात आली. वरील दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात, त्यामुळे संबंधीत कार्यालयामार्फत लवकरात लवकर अर्ज प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संबंधित कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

बीज भांडवल कर्ज योजना पात्रता, अर्जपद्धती beej bhandwal yojana eligibility

चांभार समाजाअंतर्गत मोडणाऱ्या चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही महामंडळाकढे योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पुरतात करून कर्जप्रस्ताव तीन प्रतीमध्ये स्वतः मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावा. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्जप्रस्ताव स्वीकारला जाणार नाही याची काळजी अर्जदारांनी घ्यावी.

See also  Bhuvikas Bank Karjmafi Yojana | भूविकास बँक कर्जमाफी योजना

बीज भांडवलसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. तहसीलदार यांच्याकडील चालू वर्षाचा उत्पन्न दाखल.
  2. सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखल
  3. पासपोर्ट आकाराच्या फोटो
  4. शैक्षणिक दाखला
  5. शिधापत्रिकेची छायांकित प्रत
  6. आधार कार्ड अथवा मतदान कार्ड
  7. पॅनकार्ड झेरॉक्स प्रत
  8. करत आलेल्या व्यवसायबातचे दरपत्रक
  9. व्यवसाय भाडेतत्वाने असेल तर, त्याठिकाणची भाडेचिठी
  10. नमुना नंबर ८
  11. वीजबिल पावती
  12. कर पावती
  13. करारपत्र किंवा हक्क पुरावा
  14. योजनेबद्दलचा प्रकल्प अहवाल
  15. वाहनांसाठी परवाना
  16. बॅच परवाना
  17. व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र
  18. या अगोदर कोणत्याही योजनेमधून अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे तुम्हांला कर्ज प्रस्तावासोबत जोडायची आहेत. वरील कागदपत्रे self attested करून घोषणापत्र द्यायाचे आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये चौकशी करा.

बीज भांडवल कर्जप्रस्ताव कुठे सादर करावा?

बीज भांडवल कर्जप्रस्ताव अर्जदारांना विहित नमुन्यातील अर्जासह संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या ठिकाणी सादर करावयाचा आहे.

जालना जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना या ठिकाणी अर्ज स्वकृती करण्यात येईल.

तुम्ही जर इतर जिल्यातील नागरिक असाल तर अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी या योजनेसंदर्भात चौकशी करून पहा.

कर्जप्रस्ताव सादर करण्याचा कालावधी

योजनेअंतर्गत कर्जप्रस्ताव दाखल करण्यासाठीची मुदत १ ते ३० जुलै २०२२ पर्येंत ठेवण्यात आली आहे. तदनंतर योजनेसाठी लागणारे वाटप करण्यात येणार आहे.

beej bhandwal yojana योजनेचा मुख्य उद्देश

  • अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार,ढोर,होलार,मोची इ.) व्यक्तीना त्यांचे जीवनमान उंचावणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळविण्याचा उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
  • बेरोजगारांना मदतीचा हात म्हणून बीज भांडवल योजनेचा मोलाचा वाट आहे, हा सुद्धा या मागचा मुख्य हेतु आहे. खेडोपाडी बरेच असे तरुण आपल्याला नौकरी शोधताना दिसून येतात. चर्मकारच नाही तर इतर समाजतील तरुणांनासुद्धा काम मिळत नाही, अश्या परिस्थिथमध्ये बीज भांडवल योजनेचा लाभ घेऊन तरुण आपला उद्योग चालू करू शकतात.
See also  महा शरद पोर्टल: maha sharad.in, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, Divyang Pension