ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन वाढ लागू, शासन निर्णय जाहीर | Grampanchayat Karmachari Vetan Vadh GR

ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायतीचा मूलभूत पाया असतात. गाव पातळीवरील विविध शासकीय कामे, नळपट्टी, घरपट्टी, करवसुली इत्यादी विविध कामामध्ये कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असतो. अश्यामध्ये कर्मचाऱ्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने मध्यंतरी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता आणि त्या पुकारलेल्या संपाला यशस्वीरित्या यश मिळाले आहे. नुकताच 22 जून 2022 दिवशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाढ लागू करण्याबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ शासन निर्णयाबदल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 61 अन्वये ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतीचे कर्मचारी नेमण्याची व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार आहेत. सध्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून किमान वेतन अधिनियम 1948 च्या तरतुदींना अनुसरून “स्थानिक स्वराज्य संस्थेचे” अंतर्गत येणाऱ्या ( ग्रामपंचायत ) कामधंदा” या रोजगारात असलेल्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना देय असलेली किमान वेतन, दर, शासन अधिसूचनेद्वारे पुनर्निर्धारित केले जातात. त्या अनुषंगाने 10 ऑगस्ट 2020 रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या 10 ऑगस्टच्या आधीसूचनेला अनुसरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ लागू करणेबाबत शासनाचा मानस होता.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे सुधारित किमान वेतन वाढ लागू

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १०.०८.२०२० रोजीच्या आधीसूचनेला अनुसरून ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांची वर्गवारी परिमंडळनिहाय म्हणजेच गावातील लोकसंख्येच्या आधारावर खालील प्रमाणे कामगारांचे मूळ किमान वेतन दर तक्त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच हे मूळ किमान वेतनवाढ दर ०१.०४.२०२२ पासून लागू असणार आहे.

अ.क्रकर्मचारी वर्गवारी परिमंडळ – १परिमंडळ – २परिमंडळ – ३
कुशल कर्मचारी१४,१२५१३,७६०१२,६६५
अर्धकुशल कर्मचारी१३,४२०१३,०५५११,९६०
अकुशल कर्मचारी१३,०८५१२,७१५११,६२५

1. परिमंडळ १ : १०,००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र.

See also  PIK Nuksan Bharpai Form 2021: PIK Vima Yojana Online Registration

२. परिमंडळ २ : ५,००० ते १०,००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र.

३. परिमंडळ ३ : ५,००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र.

वरील सदर शासन निर्णयातील तरतुदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२२ पासून लागू असतील. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.सं.क्रमांक ४०३/२२ दि. १६/०६/२०२२ अन्वये प्राप्त सहमतीचा अनुसरून निर्गमित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ दिनांक 22 जून 2022 चा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पहा!