Crop Loss Compensation : अतिवृष्टीची नोंद नसली, तरी मिळणार आर्थिक मदत | ativrushti nuksan bharpai madat maharashtra

ativrushti nuksan bharpai : राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, परतीचा पाऊस या कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

अश्या शेतकऱ्यांची अतिवृष्टी नोंद नसल्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता होती; परंतु अतिवृष्टी नसली तरी सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा नुकतीच शासनामार्फत करण्यात आली. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन, तुर, कापूस , मका इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टी नसली तरी सतत कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शासनाने निकषात केली सुधारणा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अधीन राहून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी डॉ. संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अतिवृष्टीच्या निकषांमध्ये बदल करून शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली.

हे सुध्दा वाचा : या बँकेतील शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार कर्जमाफी : जाणून घ्या संपूर्ण माहिती

ज्या महसूल मंडळामध्ये (Revenue Circle) अतिवृष्टीची नोंद नाही, पण पिकांचे नुकसान (Crop Loss) झाले आहे, त्या ठिकाणचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहे. तसेच या शेतकऱ्यांना निकषानुसार मदत देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा भेटला आहे.

लवकरच सर्वेक्षण पूर्ण करून उर्वरित शेतकऱ्यांनासुध्दा अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे.

See also  Loan Waiver : 50 हजार अनुदान पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !