E-Shram Card Information in Marathi : ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करा दोन लाखापर्यंत लाभ मिळवा !

मित्रांनो, तुम्हांला E-Shram Card बद्दल माहिती आहे का ? नसेल तर, आज आपण त्याबद्दलचीच माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकार राज्यातील विविध प्रवर्गातील, क्षेत्रातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवित असते.

असंगठित कामगारांसाठीची अशीच एक योजना म्हणजे ई-श्रम कार्ड योजना होय. असंगठित कामगारांना सुरक्षा (security) पुरविण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडून EShram Card Yojana सुरु करण्यात आली.

देशातील सर्व असंगठित कामगारांचा डेटाबेस (Database) तयार केला जात असून, नोंदणीसाठी ई-श्रम पोर्टलसुध्दा सुरु करण्यात आलं आहे. या नोंदणीनंतर कामगारांना काम करत असतांना कोणत्याही प्रकारची जीवितहानी, अपघात, विकलांगपण आल्यास शासनाकडून विमा (insurance) प्रदान केला जातो.

E-Shram Card Information in Marathi

आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार व मजुरांची संख्या आहे. देशातील असे अनेक मजदूर व कामगार आहेत, ज्यांची परिस्थिती आज सध्या स्थितीमध्ये सुद्धा खूपच हालाखीची आहे. यामुळे त्यांचा हवा तसा विकास घडून आलेला आपल्याला दिसून येत नाही.

📢 हे सुध्दा वाचा : इंडिया पोस्टात 795 रु. मिळवा 20 लाखाचा विमा

अशाच दुर्लक्षित झालेल्या कामगार व मजदूर लोकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी केंद्र शासनामार्फत श्रमिक लोकांसाठी सुरू करण्यात आलेली विशेष योजना (Schemes) म्हणजे ई-श्रम कार्ड योजना होय.

या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात राहत असलेल्या मजदूरापर्यंत, कामगारापर्यंत शासनाच्या सर्व सुविधा, योजना, यांचा लाभ मिळवून द्यावा हा या योजनेचा मुख्य उद्देश.

ई-श्रम कार्ड कोणाला काढता येणार ?

  • १६ ते ५९ वर्ष वयोगातील असंघटित कामगार, शेतमजूर व भूमीहीन शेतकरी इत्यादी नागरिकांना ई-श्रम कार्ड काढता येतो.
  • शासकीय नौकरी त्याचप्रमाणे जास्त प्रमाणावर शेतजमीन असणारे शेतकरी मात्र या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
See also  मतदान कार्डसुद्धा होणार आधार कार्डशी लिंक | Voter Card Link To Aadhar Card Online

ई-श्रम कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड झेरॉक्स (Aadhar Card)
  • बँक पासबुक झेरॉक्स (Bank Passbook)
  • मोबाईल क्रमांक
  • शैक्षणिक माहिती (Educational Details)
  • शेती असेल / नसेल माहिती (Land Record)
  • वारसदार आधार कार्ड (Nominee Aadhaar)
  • रेशन कार्ड (Ration Card)
अधिक माहिती पुढे वाचा….➡️

📢 हे सुध्दा वाचा : पीएमएफई योजना – शेतकऱ्यांना उद्योगासाठी 10 लाखापर्यंत अनुदानसहित आर्थिक मदत !

ई-श्रम कार्ड मोबाईलवरून कसा काढावा ?

ई-श्रम काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://www.eshram.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर नोंदणी करून तुम्ही तुमचा ई-श्रम कार्ड काढू शकता.

ई-श्रम कार्ड चे फायदे काय आहेत ?

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम काळजी मोठ्या प्रमाणावर फायदे आहेत. यामध्ये सर्व शासकीय योजनांचा लाभ, २ लाखापर्यंत विमा इत्यादी.

ई-श्रम कार्ड म्हणजे काय ?

श्रमिक लोकांसाठी तयार करण्यात आलेली कार्ड म्हणजे ई-श्रम कार्ड होय. ज्यामध्ये श्रमिक, कामगार व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो.

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी वयाची अट आहे का ?

हो, वयाच्या 16 ते 59 वयोमर्यादेमधील व्यक्तीच फक्त ई-श्रम कार्ड काढू शकतात.

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी शेवटची दिनांक काय आहे ?

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अंतिम दिनांक शासनामार्फत ठेवण्यात आलेली नाही; त्यामुळे पात्र नागरिक केव्हाही ई-श्रम कार्ड काढू शकतात.

ई-श्रम कार्ड योजना शासनामार्फत कधी सुरू करण्यात आली ?

ई-श्रम कार्ड योजना केंद्र शासनामार्फत सन 2021 मध्ये सुरू करण्यात आली.