Dahi Handi arthik madat yojana maharashtra 2022 | दहीहंडी गोविंदांना आर्थिक सहाय्य योजना | दहीहंडी उत्सवादरम्यान अपघात झाल्यास गोविंदांना आर्थिक मदत

Dahi Handi arthik madat yojana : राज्यामध्ये दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आणि तितक्याच उत्सुकतेने आयोजित करण्यात येते. दहीहंडीमध्ये मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याची प्रक्रिया दहीहंडीमध्ये सहभागीत गोविंदा मार्फत केली जाते. दहीहंडी उत्सव साजरा करताना मानवी मनोरे रचना धोका असल्याचे निरीक्षण न्यायालय प्रशासन यांच्यामार्फत वारंवार करण्यात आलेले आहे.

दहीहंडी गोविंदांना आर्थिक सहाय्य योजना (Dahi Handi arthik madat yojana)

मात्र लोकोत्सव साजरा करण्यासाठी परंपरा जपण्यासाठी हे तितकेच महत्त्वाचे असल्याने, अनेक गोविंदा पथक त्यामध्ये सहभागी होतात. बऱ्याच वेळेस दहीहंडीमध्ये अपघात दुर्घटना होतात. काही वेळेस पथकातील गोविंदाचा अपघाती मृत्यू अथवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. या अनुषंगाने सर्व गोष्टीचा विचार करून राज्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा विमा उतरवून त्यांना आर्थिक संरक्षण देण्याची योजना Dahi Handi arthik madat yojana शासन स्तरावर तपासण्यात येत आहे.

यावर्षीचा दहीहंडी उत्सव जवळ आल्याने Dahi Handi arthik madat yojana विहित करण्याच्या कार्यवाहीसाठी खूपच कमी वेळ आहे. त्यामुळे चालू वर्ष म्हणजेच 19 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या दहीहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना गोविंदांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास आर्थिक सहाय्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

दहीहंडी गोविंदांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत

वरील सर्व बाबींचा विचार करता दहीहंडीमध्ये गोविंदाचा मृत्यू झाल्यास अथवा त्यांना गंभीर दुखापत होऊन अवयव निकामी झाल्यास अशा गोविंदांना किंवा कायदेशीर वारसास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खालीलप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्याची शासन मान्यता देण्यात येत आहे.

  1. गोविंदा पथकातील सहभागी खेळाडू म्हणजेच दहीहंडीच्या प्रत्येक थरावरून किंवा मानवी मनोऱ्यावरू एखाद्या गोविंदा पडल्याने मृत्यू झाल्यास त्या खेळाडूच्या कायदेशीर वारसास रुपये दहा लाख आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
  2. गोविंदा पथकातील सहभागी खेळाडू प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरून किंवा मानवी मनोऱ्यावरून पडल्याने त्याचे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय किंवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्यास 7.50 लाख इतके अर्थसहाय्य देण्यात येईल.
  3. गोविंदा पथकातील सहभागी खेळाडू प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरून किंवा मानवी मनोऱ्यावरून पडल्याने त्याचा एक डोळा अथवा एक हात अथवा एक पाय अथवा कोणताही महत्त्वाचा एक अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्या गोविंदास रू. 5 लाख इतकी रक्कम अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल.
  • सूचना :- सदर आदेश केवळ चालू वर्षासाठी ( सन 2022 ) लागू राहील. दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदाचा विमा उतरविणे याबाबत निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात येईल.
  • दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना वरीलप्रमाणे आर्थिक साह्य करण्यासंदर्भात अटी व शर्ती या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-अ” मध्ये नमूद केल्यानुसार राहतील. या शासन निर्णयाला अनुसरून आर्थिक साह्यास पात्र असणाऱ्या गोविंदांना अर्थसाह्य करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याची कार्यपद्धती, अर्जाचे स्वरूप व सहपत्रे याबाबतचे आदेश स्वातंत्रपणे देण्यात येतील.
See also  PIK Nuksan Bharpai Form 2021: PIK Vima Yojana Online Registration

दहीहंडी दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्यसाठीच्या अटी व शर्ती

  1. महाराष्ट्रमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अपघातग्रस्त गोविंदांना सदर आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
  2. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजक संस्थेने, दहीहंडी आयोजनासाठी स्थानिक प्रशासनाच्या व तसेच अन्य आवश्यक परवानगी घेणे आवश्यक असेल.
  3. दहीहंडी आयोजना संदर्भात मा. न्यायालय, प्रशासन, पोलिस यंत्रणा यांच्यामार्फत वेळोवेळी देण्यात येत असलेल्या सूचना व आदेशांचे पालन आयोजक व सहभागी गोविंदा पथकाने करणे आवश्यक राहील.
  4. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकामधील गोविंदांनी औपचारिक अथवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतले असल्याचे आयोजकांनी खात्री करून घ्यावी.
  5. दहीहंडी उत्सव आयोजित करत असताना संस्थेने सहभागी गोविंदाच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सर्व उपाययोजना केलेल्या असाव्यात.
  6. मानवी मनोरे तयार करण्या व्यतिरिक्त आणि कोणत्या कारणामुळे गोविंदाचा अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य देण्यात येणार नाही.
  7. दहीहंडी मध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असेल सोबतच अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या गोविंदांना यामध्ये सहभाग घेता येणार नाही किंवा सहभाग घेतल्यास सदर आर्थिक सहाय्यक देण्यात येणार नाही.
  8. दहीहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचत असताना अपघात झाल्यास आयोजकांनी तात्काळ गोविंदांना वैद्यकीय उपचार प्रक्रिया करावी.
  9. दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचत असताना झालेल्या अपघाताबद्दल आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन त्याचप्रमाणे संबंधित पोलीस यंत्रणेकडे याबाबतचा अहवाल सादर करावा.

GR पीडीएफ डाउनलोड लिंक