EMI कमी करण्याचे 3 उपाय | 3 Best Methods to Reduce EMI

3 Best Methods to Reduce EMI : मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असते की, एखादी वस्तू आपण हफ्त्यावर घ्यावी व कालांतराने त्या वस्तूची रक्कम तुकड्या-तुकड्यांमध्ये भरून ती वस्तू कायमची आपली करून घ्यावी. मग ती वस्तू घर, मोबाईल, कार, प्लॉट यापैकी असू शकते. पण यामध्ये मित्रांनो अडचण येते ती म्हणजे हप्ता भरण्याची. तर आजच्या लेखामध्ये आपण या संदर्भातील महत्त्वाचे 3 Best Methods to Reduce EMI पाहणार आहोत. ज्या Methods ने आपल्याला नक्की समजेल की, आपण कशाप्रकारे EMI चे ओझे कमी करू शकतो.

रिझर्व बँकेने मागील 3 महिन्यात रेपो दर ( RBI REPO RATE ) 1.4 टक्क्यांनी वाढविला आहे. रेपोदराचा वाढीव फटका ग्रहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसला. मागील दोन वर्षाच्या तुलनेत गृहकर्जाचे ( Home Loan ) व्याजदर अजून 1 टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व जितक्या वेळा व्याजदर वाढवेल, तितक्याच वेळा रिझर्व बँक ही रेपोदरात वाढ करू शकते. परिणामी; आपल्यामार्फत भरला जाणारा गृहकर्जाचा EMI सुद्धा वाढला जाईल. यामुळे हप्त्याने एखादी वस्तू घेणे आपल्या डोक्याला ताण होऊ शकतो. हा EMI कमी करण्यासाठी कोणते 3 उपाय आपण अवलंबू शकतो ते पाहूयात.

Below Are 3 Best Methods to Reduce EMI

कर्ज भरण्याचा कालावधी वाढून घ्या ( EMI Tenure Extend )

कर्जाचा कालावधी वाढवला म्हणजेच ईएमआय कमी बसू शकतो. हा परिणामी थोडा कर्ज आपल्याला जास्त भरावा लागतो; परंतु ठीक आहे आपल्याला कर्जाचा कालावधी तर वाढून भेटतो. त्यामुळे इतर खर्चासह आपण चालू EMI सुद्धा कोणतीही काटकसर न करता भरू शकतो. त्यासाठी बँकेला कर्जाचे रीशेड्युलिंग करायला सांगावे लागते. हा पर्याय त्यांच्यासाठी चांगला आहे, ज्यांच्या अंगावर एकाच वेळी अनेक कर्ज आहेत. कारण हप्त्याचा कालावधी वाढवल्यामुळे व्याजामध्येसुद्धा वाढ होते.

See also  संजय गांधी निराधार योजना 2022 संपूर्ण माहिती | Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2022

स्वस्त कर्ज देणारी बँक शोधा ( lowest loan providing banks )

प्रत्येक बँकेचे कर्ज दर कमी-जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्याला अशी बँक शोधावी लागेल ज्या बँकेकडून आपल्याला कमीत-कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. कारण स्वस्त कर्ज देणाऱ्या बँकेकडून कर्ज घेतल्यास आपल्याला ईएमआय ( EMI ) कमी बसू शकतो. अधिक कालावधीसाठी जास्त कर्जाची रक्कम घेत असल्यास त्यामध्ये थोडाफार जरी कर्ज दर कमी होत असेल; तर आपले खूप पैसे वाचू शकतात. त्यासाठी दीर्घकालीन कर्जासाठी दुसऱ्या बँकेच्या शोधात जाणे फायदेशीर ठरू शकते.

दिरंगाई ( Deferment ) पर्याय निवडू शकता

काही वेळेस ग्राहक कर्जाचा डिफरमेंट ( Deferment ) पर्यायसुद्धा निवडू शकतात. ज्यामध्ये ग्राहकांना काही निश्चित कालावधीसाठी मुद्दल तशीच ठेवून केवळ व्याज भरण्याची सुविधा दिली जाते. या प्रक्रियेमध्ये मुद्दल जशास तशी शिल्लक राहत असल्यामुळे कर्जदारास आर्थिक फटका बसतो. कारण डिफरमेंट कालावधीत थकीत रकमेवर साधारण व्याज द्यावे लागते. परंतु हा पर्याय फारच मोठ्या आर्थिक संकटाच्या वेळी वापरण्यासारखाच आहे.

उदा. 1 Simple कॅल्क्युलेशन

  • समजा, तुम्ही 15 वर्षासाठी 6.5 टक्के दराने 50 लाख रुपयाचे कर्ज घेतले असल्यास तुम्हाला ईएमआय ( EMI ) 43,555 रुपये इतका बसतो. रेपो दरात 1.4 टक्के वाढ झाल्याने व्याजदर 7.9 टक्के होईल.
  • त्यामुळे ईएमआय ( EMI ) वाढन 47,494 रुपये होईल व कर्जाचा कालावधी 15 वर्षावरून 20 वर्ष केल्यास 7.9 टक्के व्याजदराने हप्ता घटून 41,511रुपये होईल मात्र यामध्ये तुमची व्याजात जाणारी रक्कम 35.5 लाखावरून वाढून 49.6 रुपये होईल