Inter Caste Marriage Scheme in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2022 | एकूण अनुदान प्रोत्साहनपर 3 लाखापर्यंत रक्कम

समाजामध्ये आंतरजातीय विवाहासाठी म्हणजेच Inter Caste Marriage Scheme साठी निर्बंध असले तरी शासनामार्फत अशा प्रकारच्या जातीपातींना दूर करण्यासाठी विविध अशा योजना राबवल्या जातात. ज्यामधील अशाच प्रकारची एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना. आंतरजातीय विवाह करणाऱ्या युवक-युवतींसाठी ही प्रोत्साहन योजना महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. आज या लेखामध्ये महाराष्ट्र सरकारच्या आंतरजातीय विवाह अनुदानबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Table of Contents

Inter Caste Marriage Scheme in Maharashtra

या योजनेअंतर्गत पूर्वी आंतरजातीय विवाह करणाऱ्या लाभार्थी जोडप्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जात असे; ( Inter Caste Marriage Scheme ) पण यामध्ये आता वाढ करून 3 लाख रुपये रक्कम दिली जाते. ज्यामध्ये 50 हजार रुपये राज्यशासनामार्फत व उर्वरित 2.5 लाख रुपये रक्कम डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिली जाते.

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र

आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तरी या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून मान्यता देण्यात येते. आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो किंवा ऑफलाईन पद्धतीने समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करता येतो.

योजनेचे संपूर्ण नावआंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र
योजना कोणामार्फत सुरुमहाराष्ट्र सरकार
लाभार्थी कोण ?आंतरजातीय विवाह करणारे जोडपे
योजनेचा मुख्य उद्देशजात-पात भेदभाव दूर करणे
प्रोत्साहनपर अनुदान रक्कम ( पूर्वी )५०,००० -/ रु.
प्रोत्साहनपर अनुदान रक्कम ( आता )३०,०००० -/ रु.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा.

आंतरजातीय विवाह योजनेचा उद्देश

Purpose of Inter Caste Marriage Scheme

  • समाजात होणारा जात, धर्म भेदभाव नष्ट करून समाजामध्ये एकरूपता समानता निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाह योजना सुरुवात करण्यात आली.
  • योजनेअंतर्गत राज्यातील युवक-युवतींना आर्थिक मदत मिळून त्यांचा आर्थिक विकास व्हावा हा दुयम उद्देश.
  • समाजातील विविध जाती धर्माबद्दल असलेला गैरसमज दूर करणे.
  • प्रत्येक धर्माला हिनतेच्या भावनेने न पाहता समाजातील प्रत्येक धर्माला समान स्थान देणे हा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे.
See also  ग्रामपंचायत संगणक परिचालकांना सानुग्रह अनुदान केव्हा मिळणार | Grampanchayat Karmachari Mandhan

आंतरजातीय विवाह योजनेची वैशिष्ट्ये

Features of Intercaste Marriage Scheme

  • समाजातील जाती मतभेद दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे आंतरजातीय विवाह योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आंतरजातीय विवाह योजना समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
  • आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीमधील आंतरजातीय विवाहास राज्य शासनाकडून 50 हजार रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या मदतीने 2.5 लाख रुपये असे दोन्ही मिळून एकत्रित 30,0000 -/ रुपये मदत लाभार्थी वधू-वरास दिली जाते.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम डीबीटी ( DBT ) प्रणालीच्या साह्याने राबविली जात असल्यामुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम कोणत्याही अडचणी शिवाय जमा केली जाते.
  • लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदारास कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही ज्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

आंतरजातीय विवाह योजनेचे लाभार्थ

Inter Caste Marriage Scheme Beneficiary

आंतरजातीय विवाह योजनेच्या कटिबंधात राहून जे लाभार्थी संपूर्ण अटी व शर्तीसह आंतरजातीय विवाह करतील व त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे बाळगतील; अशा सर्व महाराष्ट्र राज्यातील आंतरजातीय विवाह केलेले युवक-युवती किंवा नवविवाहित जोडपे या योजनेसाठी लाभार्थी असतील.

आंतरजातीय विवाह योजनेचे फायदे

Inter Caste Marriage Scheme Benefits

  • महाराष्ट्र राज्यातील जातीबद्दल मतभेद दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत शासनाकडून 50,000 -/ रुपयेपर्यंत थेट रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये लाभार्थी विवाहित जोडप्याच्या बचत खात्यामध्ये जमा केले जातात.
  • आंतरजातीय विवाह योजनेच्या साह्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या युवक-युवतींना आर्थिक मदत झाल्याकारणाने त्यांचे जीवनमान सुधारेल.
  • त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होऊन ती जोडपी सशक्त आत्मनिर्भर बनतील.
  • समाजातील जाती धर्माबद्दल असलेला गैरसमज दूर होऊन जाती, धर्म भेदभाव नष्ट होण्यास मदत होईल.
See also  वनहत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी अर्थसहाय्य अनुदान योजना | वन्यप्राणी पीक नुकसान भरपाई योजना महाराष्ट्र

आंतरजातीय विवाह योजनेसाठी आवश्यक पात्रता

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Eligibility

आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आवश्यक पात्रता म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

आंतरजातीय विवाह योजनेच्या अटी व शर्ती

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Terms & Conditions

  • योजनेअंतर्गत फक्त महाराष्ट्र राज्यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील आंतरजातीय विवाह करणारे लाभार्थी असतील तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • विवाहित जोडप्यापैकी एक जण वधू किंवा वर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान रक्कम फक्त त्याच लाभार्थ्यांना दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जातीतील मुलगा किंवा मुलीसोबत विवाह केला असेल.
  • विवाह हिंदू अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत ज्या जोडप्यांचा विवाह झालेला असेल त्यांनाच या योजनेचा लाभ भेटेल.
  • आंतरजातीय विवाह करण्यासाठी मुलाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांनी या आधी जर केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा फायदा घेतला असेल तर आशा लाभार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Inter Caste Marriage Scheme Required Documents

  • विवाहित जोडप्यांचा विवाह नोंदणी दाखला
  • वर्ग वधू यांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे वधू व वर दोघांची फोटो
  • वधू-वरांचे एकत्रित काढलेला कलर फोटो
  • लाभार्थी विवाहित जोडप्यापैकी एक जण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील असल्याचा दाखला.
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • लाभार्थ्याकडे कोर्ट मॅरेज विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक
  • आधार कार्ड
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र
  • जातीचा प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत संयुक्त बँकचे खाते पासबुक
See also  WhatsApp Business : व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे !

आंतरजातीय विवाह योजना अर्ज रद्द होण्याची कारणे

खालीलप्रमाणे अर्जामध्ये कुठलेही प्रकारची त्रुटी आढळल्यास अथवा चुकीची माहिती अर्जदारमार्फत दाखल केल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.

  • अर्जामध्ये संपूर्ण व्यवस्थित माहिती न भरता अर्ज दाखल केल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जामध्ये खोटी माहिती भरल्याससुद्धा अर्ज रद्द करण्यात येतो.
  • विवाह आंतरजातीय नसल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
  • अर्जामध्ये बँकेची तपशील चुकीची भरल्यास अर्जदारांना लाभाची रक्कम खात्यावरती जमा करण्यात येत नाही.
  • बँकेचा आयएफसी कोड चुकीचा भरला गेल्याससुद्धा रक्कम जमा करता येत नाही.
  • एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.
  • अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाकडून आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अर्ज रद्द करण्यात येतो.

आंतरजातीय विवाह नोंदणीसाठी ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया

Intercast Marriage Scheme Offline Application Process

  • आंतरजातीय विवाह नोंदणी करण्यासाठी अर्जदार संबंधित जिल्हा समाजकल्याण अधिकारी ,जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात जाऊन या अर्जाचा नमुना घेऊन.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती योग्य सविस्तर रित्या भरून सोबत कागदपत्रांची झेरॉक्स परत जोडून सदर अर्थ त्या ठिकाणी जमा करू शकतात.
  • अर्ज जमा केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून अर्जाची पोचपावती दिली जाते. ती पोचपावती भविष्य काळातील आढाव्यासाठी आपल्याला सांभाळून ठेवायची आहे.

आंतरजातीय विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया

Inter Caste Marriage Scheme Online Application/Registration Process

  • आंतरजातीय विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती ( जश्याप्रकारे वर मुलाचे संपूर्ण नाव, वधू मुलीचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, जात प्रवर्गाची माहिती, लग्नाची तारीख, आधार क्रमांक इत्यादी ) सविस्तर व योग्यरीत्या भरून सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करावा.
  • अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आंतरजातीय विवाहासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

आंतरजातीय विवाह संबंधात विचारले जाणारे विविध प्रश्न व उत्तरे 👇

आंतरजातीय विवाह योजना कोणत्या जात प्रवर्गासाठी लागू आहे ?

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू आहे.

आंतरजातीय विवाहास किती अनुदान किंवा लाभ रक्कम दिली जाते ?

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून ५०,०००-/ रु. रक्कम दिली जाते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर फॉउंडेशनच्या वतीने २.५ लाख रक्कम लाभाच्या स्वरूपात दिली जाते.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा ?

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीचा अवलंब करता येतो. ऑफलाईन अर्जसाठी संबंधित जिल्हा समाजकल्याण कार्यालयास संपर्क करावा.

आंतरजातीय विवाह करण्यासाठी वयोमर्यादा आत आहे का ?

हो, विवाह करण्यासाठी मुलाचे वय २१ वर्ष व मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.