WhatsApp Business : व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे !

WhatsApp Business : सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप हा एप्लीकेशन वापरतात; परंतु तुम्हाला माहित आहे का ?

व्हाट्सअपच्या वाढत्या मागणीमुळे व्हाट्सअप कंपनीमार्फत काही गोष्टीसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. त्याच संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊयात.

WhatsApp Premium Subscription Plan

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये दुसरा कोणता एप्लीकेशन असो किंवा नसो; पण व्हाट्सअप नक्कीच असणार याबद्दलची मला तुम्हाला सर्वांनाच खात्री आहे.

आता व्हाट्सअपमध्ये मोठे बदल होणार आहेत. कारण व्हाट्सअप कंपनी आता WhatsApp Business मॉडेलकडे लक्ष देत आहे. व्हाट्सअपने प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन आणण्याची तयारी चालू केली आहे. यामध्ये प्रीमियम युजरसाठी नवीन विविध फिचर्स दिले जाणार आहेत.

10 Device वर व्हाट्सअप चालवता येणार

सध्या स्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 4 Devices वर व्हाट्सअप कनेक्ट करता येतं; पण व्हाट्सअप वापरकर्त्यांनकडून सबस्क्रीप्शन प्लॅन घेतल्यानंतर 10 Device वरती एकाच वेळेस कनेक्ट होण्याची सुविधा व्हाट्सअप कंपनीमार्फत दिली जाणार आहे.

ग्रुपमध्ये 1024 मेंबर असणार

मित्रांनो, तुम्हाला जर माहित असेल तर; पूर्वी व्हाट्सअप ग्रुपमध्ये फक्त 256 सदस्य Add करण्याची मर्यादा होती. त्यानंतर यामध्ये वाढ करून 512 सदस्यांची मर्यादा देण्यात आली.आता परत एक वेळेस युजरच्या मागणीनुसार व्हाट्सअप ग्रुप मेंबरमध्ये वाढ करून 1024 सदस्य संख्या देण्यात येणार आहे.

Credit Card वरून पैसे काढताय का ? पैसे काढण्यापूर्वी ही माहिती एकवेळेस नक्की वाचा !

या सुविधेमुळे आपल्याला आता एका ग्रुपमध्ये 1024 Member Add करता येणार आहेत. 2022 पर्यंत सदस्य मर्यादा वाढवली जाऊ शकते. याविरुद्ध व्हॉट्सॲपचा स्पर्धी टेलिग्राम अँपचा जर विचार केला; तर त्या ठिकाणी एका ग्रुपमध्ये 2 लाखापेक्षा अधिक सदस्य संख्या जोडण्याची सुविधा आहे.

See also  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार अनुदान 20 ऑक्टोबरला मिळणार | MJPSKY Karjmafi Anudan Yojana 2022

Video Calling नवीन Feature

Premium Subscription मध्ये जोडण्यात आलेले आणखी एक फिचर म्हणजे व्हिडिओ कॉलिंगमध्ये आपल्याला सध्या स्थितीमध्ये एका व्हिडिओ कॉल वर जास्तीत जास्त 32 लोक जोडता येतात. यामध्ये आता वाढ करून Video Calling मध्ये जास्तीत जास्त लोक जोडले जाऊ शकते.

Website ची लिंकसुद्धा जोडता येणार

ऑनलाइन क्रियेटर किंवा कंटेंट क्रियेटर तसेच Business Man अशा व्यक्तींची स्वतःची जर वेबसाईट असेल; तर त्या वेबसाईटची लिंक जोडण्याची सुविधासुद्धा व्हाट्सअपमार्फत लवकरच येणाऱ्या Premium Subscription प्लॅनमध्ये दिली जाणार आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर ग्राहक डायरेक्ट वेबसाईटवरती जातील.

  • सर्च ऑप्शनमध्ये वेबसाईटचे नाव टाकल्यानंतर वेबसाईट लगेच दिसायला लागेल.
  • एक वेळेस वेबसाईट ऍड केल्यानंतर 90 दिवसात वेबसाईट बदलता येईल.

सूचना : Android व आयवोएस यांसाठी प्रीमियम प्लॅन वापरता येईल; परंतु हा प्लॅन सध्यास्थितीमध्ये फक्त Business Users साठी उपलब्ध असेल. इतर वापरकर्त्याना म्हणजेच वैयक्तिक युझर्सना याचा वापर करता येणार नाही.