Kusum Solar Pump Yojana : सोलर पंपासाठी 90 टक्के अनुदान, असा करा अर्ज

Kusum Solar Pump Yojana : केंद्रसरकारकडून राबविल्या जाणाऱ्या पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सोलार पंप बसविण्यासाठी 90 % पर्यंत अनुदान दिलं जात आहे. त्याबद्दलची थोडक्यात माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 30 ऑक्टोबर रोजीच्या मन की बात कार्यक्रमात सांगितली होती.

ही योजना मुख्यत्वे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपट करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आली आहे. शेतकरी योजनेअंतर्गत अर्ज करून अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. यासोबतच शेतकऱ्यांकडे जर पडीक जमीन असेल, तर या योजनेच्या माध्यमातून पडीक जमीन भाडेतत्वावर वीजनिर्मितीसाठी देऊन शेतकरी अधिकचा लाभ मिळवू शकतात.

या योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकरी घेऊ शकतात व आपल्या शेतीमध्ये कृषी सोलर सिंचन पंप बसवून एकदम सोप्या पद्धतीने सिंचन करू शकतात.

काय आहे Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली असून, Kusum Solar Pump Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून दिले जातात. योजनेतून सोलारपंप बसविण्यासाठी 90 टक्के शासनाकडून अनुदान दिलं जात, तर उर्वरित 10 टक्के रक्कम स्वतः शेतकऱ्यांना भरावी लागते.

Overview of PM Kusum Solar Pump Yojana

योजनाPM कुसुम सोलारपंप योजना
सुरू करण्यात आलीकेंद्रशासनामार्फत
अनुदान90 टक्क्यांपर्यंत अनुदान देय
लाभार्थी वर्गशेतकरी
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

सोलर पॅनलपासून तयार होणारी वीज सिंचनासाठी वापरता येईल, त्याचप्रमाणे जास्तीची वीजनिर्मिती होत असल्यास, शेतकरी ती वीज कंपनीलासुध्दा विकू शकतील. सोलर पॅनल जवळपास 25 वर्ष चालतील आणि याची काळजी पण सोप्या पद्धतीने घेता येईल.

Solar Pump साठी अर्ज कोण करू शकतात ?

देशातील कोणतेही शेतकरी अर्ज करू शकतात, ज्यांना सोलर पंपाची आवश्यकता असेल, ऑनलाईन फॉर्म भरून कुसुम सोलर पंपाचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.

See also  Low Interest Home Loan Banks in Maharashtra | या बँकेत 7 टक्क्यापेक्षा कमी व्याज दराने गृहकर्ज

या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे गट, पीक उत्पादन संस्था, पंचायत FPO, पंचायाती, सहकारी संस्था इत्यादी घटकातील अर्जदारसुद्धा अर्ज करू शकता आणि अतिरिक्त तयार होणारी वीज सरप्लस वितरण कंपनी Discom ला विकून वर्षाकाठी एक लाखापर्यंत लाभ मिळवू शकतात.

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड (Aadhar Card)
  • अर्जदारांचा फोटो
  • रेशनकार्ड
  • ओळखपत्र
  • बँक पासबुक (Bank Passbook)
  • रजिस्ट्रेशन फॉर्म
  • शेत जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा (Land Record)
  • मोबाईल क्रमांक

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा