तरुणांसाठी आनंदाची बातमी ; राज्यात 7200 पदांची पोलीस भरती लवकरचं

Police Bharti 2022 : पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीमुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.

राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

5200 पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेनं आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली, शारिरीक क्षमता चाचणी झाली आता त्याची अंतिम यादी करण्याचं काम सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

टप्प्याटप्प्यानं पोलीस भरती होणार
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

5200 पदांची भरती अंतिम टप्प्यात
राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5200 पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे. विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळं येत्या काही काळात 5200 पदांवर युवकांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.

See also  बॉम्बे उच्च न्यायालयात ‘वाहनचालक’ पदांसाठी भरती, पगार ६२,२०० मिळेल

हे देखील वाचा :

  • ऐतिहासिक निर्णय ; हायकोर्टाच्या आदेशांनंतर आता तृतीयपंथीयांनाही पोलीस भरतीत संधी..
  • AIIMS मध्ये 254 जागांसाठी भरती, 12वी ते पदवीधर अर्ज करू शकतात
  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे येथे 37 जागांसाठी भरती
  • MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 डिसेंबर 2022
  • मुंबईत महारोजगार मेळाव्यात ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी