आनंदाची बातमी ! MahaDBT पोर्टलवर शेतकऱ्यांची लॉटरी लागली ! पुढील 7 दिवसात हे काम करा, तरच मिळेल लाभ !

MahaDBT Lottery Update : शेतकरी मित्रांनो, शासनामार्फत कृषी विभागासंदर्भात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये केंद्रसरकार व राज्यसरकार यांचा समावेश आहे. कृषी क्षेत्राला विकसित करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.

पूर्वीचा जर तुम्ही विचार केला, तर शेतकऱ्यांना बहुतांश योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता, त्याचप्रमाणे विविध घटकांसाठी वेगवेगळ्या पोर्टलवरती नोंदणी करावी लागत असे; परंतु शासनामार्फत महाडीबीटी पोर्टल चालू केल्यानंतर शेतकऱ्यांना ” एक शेतकरी एक अर्ज “ या संकल्पनेअंतर्गत विविध योजना एकाच पोर्टलच्या माध्यमातून मिळू लागल्या.

MahaDBT Portal लॉटरी संदर्भात महत्वपूर्ण अपडेट

” एक शेतकरी एक अर्ज “ या संकल्पनेचा पोर्टल म्हणजेच महाडीबीटी पोर्टल, ज्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध ठिकाणाहून अर्ज न करता एकाच पोर्टलवरून कृषी विभागाशी निगडित विविध घटकासाठी अर्ज करता येतो. MahaDBT पोर्टल लॉटरी संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे त्यासंदर्भात आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत.

लॉटरी लागली पुढे काय ?

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी विविध घटकांतर्गत अर्ज केलेला होता, अश्या सर्व शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी लागलेली आहे. त्याबद्दलचा एसएमएससुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर भेटला असेल, आता बहूतांश शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की ? लॉटरीमध्ये नंबर लागला पुढे काय ? अनुदान लगेच मिळणार का ?

लॉटरी लागल्यानंतर महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या नवीन नियमानुसार लॉटरी लागल्यापासून शेतकऱ्यांना पुढील दिवसांमध्ये आवश्यक सर्व कागदपत्र पोर्टलवरती अपलोड करावी लागतात; पण शेतकऱ्यांनी या दिवसांमध्ये कागदपत्र अपलोड न केल्यास तो घटक किंवा योजना ऑटोमॅटिक रद्द करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील दिवसांमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे पोर्टलवरती अपलोड करावीत.

See also  अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 शासन निर्णय आला | Ativrushti Nuksan Bharpai 2022 GR Declared

sms आला नसेल तर ?

बऱ्याच शेतकऱ्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे लॉटरी लागूनसुद्धा; जर एसएमएस आलेले नसतील, तर अशा शेतकऱ्यांनी आपला युजरआयडी आणि पासवर्ड टाकून किंवा आधार क्रमांक टाकून महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून संबंधित घटकासाठी तुमची निवड झालेली आहे का नाही ते तपासून पाहू शकतात.

जर तुम्हाला लॉटरी लागल्या संदर्भात एसएमएस प्राप्त झाला नसेल; तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या वेबसाईटवर जाऊन युजर आयडी आणि लॉगिन पासवर्ड नमूद करून लॉगिन करून संबंधित अर्जाची स्थिती तपासू शकता.

पुढील प्रक्रिया काय असेल ?

लॉगिन करून आवश्यक ती कागदपत्र लाभार्थीमार्फत अपलोड करण्यात आल्यानंतर, पुढील ३-४ दिवसाच्या आत तुम्हाला संमतीपत्र दिलं जातं. संमतीपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लॉगिन करून पाहू शकता, ज्यावरती तुम्हाला मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम व इतर माहिती नमूद असते.

📢 हे सुध्दा वाचा : ५० हजार कर्जमाफी दुसरी यादी जाहीर, पहा तुमचं नाव आहे का ?

संमतीपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेमध्ये तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेला असेल, त्या संदर्भातील पावती, टेस्ट रिपोर्ट व इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. या बदलाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना संपर्क करू शकता.

शेतकरी मित्रांनो, जर तुमची महाडीबीटीच्या फार्मर पोर्टलवर लॉटरी लागली असेल, तर वेळेमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर अपलोड करून घ्या अन्यथा तुम्हाला लॉटरी पद्धतीमधून बाद केलं जाऊ शकतं आणि तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता.

MahaDBT लॉटरीची मुदत किती असते ?

लॉटरी लागल्यापासून शेतकऱ्यांना पुढील सात दिवसांमध्ये कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

लॉटरीच्या पुढील प्रक्रिया काय असते ?

लॉटरी लागल्यानंतर शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करावे लागतात, त्यानंतर पूर्वसंमती दिली जाते, नंतर बिल, कोटेशन इत्यादी कागदपत्र अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येतं.

महाडीबीटी फार्मर पोर्टलवर अर्ज कसा करावा ?

सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर झाले त्यानंतर नोंदणी करून विविध घटकांसाठी अर्ज करावा.

See also  Dahi Handi arthik madat yojana maharashtra 2022 | दहीहंडी गोविंदांना आर्थिक सहाय्य योजना | दहीहंडी उत्सवादरम्यान अपघात झाल्यास गोविंदांना आर्थिक मदत

एक शेतकरी एक अर्ज योजना काय आहे ?

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली एक शेतकरी एक अर्ज योजना म्हणजेच शेतकऱ्यांना आता एकच पोर्टलवर विविध योजनांसाठी अर्ज करता येणार.


📢 एक शेतकरी एक अर्ज जाणून घ्या : येथे पहा

📢 घरबसल्या फुकटात करा ई-फेरफार : येथे पहा