प्लास्टिकचे स्मार्ट आधार कार्ड अवैध ! 50 रु. मध्ये मागवा मूळ Smart Card | Order Aadhar Smart Card Online at 50 Rs.

Aadhar Smart Card : मित्रांनो, पूर्वी आपण आपले सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि टिकाऊ रहावीत; म्हणून त्यांचे रूपांतर स्मार्टकार्ड ( SMART CARD ) मध्ये करत होतो. ज्यामध्ये आपल्याला आपल्या ओळखपत्रासारखेच हुबेहूब प्लास्टिक कार्ड बनवून दिले जायचे; परंतु आता अश्याप्रकारचे आधार स्मार्ट कार्ड ( Aadhar Smart Card ) अवैध असणार, अशी माहिती आधारकार्ड बनवणाऱ्या UIDAI प्राधिकरणाने दिली आहे.

हे सुध्दा वाचा : मतदान ओळखपत्र आधारकार्डला घरबसल्या लिंक करा. एकदम सोप्पी पद्धत !

बाजारात बनविलेले आधारचे स्मार्ट कार्ड अवैध असून, uidai मार्फत देण्यात येणारे स्मार्ट कार्ड वैध ( Valid Smart Card ) असतील कारण त्यामध्ये सुरक्षितता लक्षात घेऊन ते स्मार्ट कार्ड UIDAI मार्फत बनविण्यात आले आहे.

Local Plastic PVC Aadhar Smart Card Invalid

आधारकार्ड मिळाल्यानंतर नागरिक बाजारातून पीव्हीसी आधारकार्ड बनवून घेतात; पण असे आधार कार्ड आता चालणार नाही असे आधार प्राधिकरणाने विविध माध्यमातून सांगितलं आहे. बाजारात बनवण्यात आलेल्या पीव्हीसी आधार कार्ड मध्ये सुरक्षितता संबंधित खूप निवासतात किंवा त्याऐवजी अशा आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचे सुरक्षा विजय फीचर्स किंवा वैशिष्ट्य नसतात त्यामुळे अशा कायद्याने अवैद्य घोषित करण्यात आले आहे.

Aadhar smart card online order

1. युआयडीएआय ( UIDAI ) मार्फतचे अधिकृत व वैध PVC AADHAR CARD ऑर्डर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ वेबसाईटवर जवावे लागेल.

myaadhar portal

2. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक व captcha code टाकल्यानंतर तुमच्या आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईलवर 6 अंकी OTP कोड पाठवण्यात येईल. OTP कोड टाकून लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर बरेच पर्याय दिसतील.

3. पर्यायापैकी Order Aadhaar PVC Card या पर्यायावर क्लिक करून तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून त्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईलवरील OTP सबमिट करून 50 Rs ऑनलाइन पेमेंट डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा यूपीएच्या माध्यमातून तुम्हाला करावी लागेल.

See also  आता मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करावे लागणार | How to Link Voting Card to Aadhar Card Online

4. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पावती भेटेल पावतीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार पीव्हीसी काळजी स्थिती पाहू शकता. ऑर्डर केल्यापासून पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील पत्त्यावर आधार पीव्हीसी कार्ड पोस्टाने पाठवण्यात येईल.

5. तर अशाप्रकारे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने घरबसल्या पन्नास रुपये मध्ये अधिकृत असे आधारकार्ड आपण ऑनलाइन ऑर्डर करू शकतो.

UIDAI PVC आधारकार्डची वैशिष्ट्ये

  • सुरक्षित क्यूआर कोड ( QR Code )
  • होलोग्रम ( Hologram )
  • मायक्रो टेक्स्ट ( Micro Text )
  • कार्ड तयार झालेली व प्रिंट केल्याची तारीख
  • लोकसंख्यकी तपशील

ऑनलाईन Aadhar PVC Card कशाप्रकारे ऑर्डर करावा ? त्यासाठी आमचा खालील व्हिडिओ नक्की पहा !