Saur Krushi Vahini Yojana | पडीक जमिनीसाठी शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 75,000 रु.

Saur Krushi Vahini Yojana : तुमच्याकडे पडीक, नापीक जमीन आहे का ? जर असेल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. शासनाकडून आता शेतकऱ्यांना पडीक जमिनीसाठी वर्षाला 75 हजार रुपये दिले जात आहेत. तर ती योजना कोणती आहे ? त्यासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, अर्ज कसा करावा ? याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात.

शेतकऱ्यांना 24 तास विजेचा पुरवठा मिळावा व मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेता यावे यासाठी राज्य सरकारमार्फत Saur Krushi Vahini Yojana सुरू करण्यात आली, या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपली पडीक, नापीक जमीन भाड्याने देऊन ७५ हजार रुपये हेक्टरी कमावू शकतात.

Saur Krushi Vahini Yojana Maharashtra 2022

शासनामार्फच्या या योजनेला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. खेड्यापाड्यामध्ये विजेची मोठ्या प्रमाणावर कपात केली जाते किंवा वेळीच वीज उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना शेती पिकासाठी लागणारी वीज उपलब्ध होत नाही.त्याचप्रमाणे सौर ऊर्जेची रक्कम भरूनसुद्धा जोडणी वेळेवर केली जात नाही; अश्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने ही योजना देण्याचा महावितरणचा विचार आहे.

Overview of Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana

योजनेचे नावसौर कृषी वाहिनी योजना
कोणामार्फत सुरूमहाराष्ट्र शासन
लाभ रक्कमहेक्टरी 75,000 रुपये
लाभार्थी वर्गशेतकरी, गट, संस्था इत्यादी
योजना कालावधी30 वर्ष
वीजनिर्मिती प्रमाण2 ते 10 मेगावॉट
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

सौर कृषी वाहिनी योजनेची उद्दिष्टे

  • सोलर वीज प्रकल्प बसवून शेतकऱ्यांना दिवसासुध्दा वीज पुरवठा उपलब्ध करून देणे.
  • शेतीप्रधान क्षेत्रामध्ये असलेल्या उपकेंद्राच्या ५ किंलोमीटर क्षेत्रामध्ये २ ते १० किलोमेगावॉट क्षमतेचे सोलर प्रकल्प उभा करणे.
See also  आनंदाची बातमी ! MahaDBT पोर्टलवर शेतकऱ्यांची लॉटरी लागली ! पुढील 7 दिवसात हे काम करा, तरच मिळेल लाभ !

सौर कृषी वाहिनीसाठी अर्ज कोण करू शकतात ?

  • शेतकरी, शेतकऱ्यांचा गट
  • को-ऑपरेटिव्ह सोसायटी, वॉटर यूजर असोसिएशन
  • साखर कारखाने, जल उपसा केंद्र
  • ग्रामपंचायत उद्योग आणि इतर संस्था यापैकी कोणीही अर्ज करू शकतात.

सौर कृषी वाहिनी जमीन व भाडेकरार

शेतकरी वर्गाकडे त्यांच्या लागवड जमिनीव्यतिरिक्त इतर पडीक अथवा नापीक जमीन असल्यास या योजनेअंतर्गत अशी जमीन सोलर वीज प्रकल्प उभारणीसाठी भाडेतत्वावर देऊन वर्षाकाठी ७५,००० रुपायापर्येंत लाभ शेतकरी मिळवू शकतात, त्यासाठी महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राची यादी संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार Saur Krushi Vahini Yojana अंतर्गत सरकारी जागेसाठी ३० वर्षासाठी भाडे फक्त १ रु असेल, तर याउलट खाजगी जमीन भाडेतत्वावर दिल्यास वार्षिक प्रती एकर ३०,००० रु. भाडे देण्यात येईल.

जागेची पात्रता

  • जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर आणि जास्तीत जास्त ५० एकर असणे आवश्यक आहे.
  • महावितरणच्या ३३/११ K.V उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल. (5 कि.मीच्या आतील)

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा ?

अर्ज कसा करावा PDFयेथे पहा
शासन निर्णययेथे पहा
मार्गदर्शक सूचनायेथे पहा
जवळील उपकेंद्र यादीयेथे पहा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे ?

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना, ज्या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे सोबतच शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन व हेक्‍टरी 75 हजार रुपये पर्यंत मदत करणे होय.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी अर्ज कुठे करावा ?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सौर कृषी वाहिनीसाठी शेतकऱ्यांना किती अनुदान दिलं जातं ?

भाडेतत्त्वावर जमीन दिल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये वार्षिक याप्रमाणे तीस वर्षापर्यंत आर्थिक सहाय्य अनुदान दिलं जातं.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी जमीन किती असावी लागते ?

सौर कृषी वाहिनी योजनेसाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी ३ एकर व जास्तीत जास्त ५० एकर जमिनीची मर्यादा आहे.


📢 रुफटॉप सोलर योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती : येथे वाचा

📢 कुसुम सोलारपंप योजनेसाठी ९० टक्के अनुदान : येथे वाचा