Tractor Subsidy Yojana | ट्रॅक्टर घ्यायचा आहे, तर मिळवा 50 टक्के अनुदान, पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Tractor Subsidy Yojana : शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व तसेच शेती अवजारांच्या खरेदीसाठी 45 ते 50 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येतं.

राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी ट्रॅक्टर सबसिडी योजनेसाठी अर्ज करू शकतात. ट्रॅक्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांना किती अनुदान दिलं जातं ? Tractor Subsidy Yojana साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ? पात्रता व कागदपत्रे कोणती लागतील ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहूयात.

Tractor Subsidy Yojana Maharashtra 2022

शेतीकामासाठी मंजूर भेटणं सध्या खूपच अवघड झालं आहे. मजुरांच्या अभावामुळे मागील काही वर्षामध्ये शेतकरी कृषीयांत्रिकीकरणाकडे मोठ्या प्रमाणावर वळल्याचे दिसून येत आहे. सध्यास्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं, तर शेती कामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या वेळ व पैशाची बचत होते. त्याचप्रमाणे काम सुव्यवस्थित होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता ट्रॅक्टर या अत्याधुनिक यंत्राकडे वळला आहे.

ट्रॅक्टर सबसिडी योजना

बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने त्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर म्हणजेच काही निश्चित रक्कम देऊन आपल्या शेतीची कामे इतर ट्रॅक्टर मालक अथवा बैलांच्या साह्याने करून घ्यावी लागतात. Tractor Subsidy Yojana

हीच बाब लक्षात घेता शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनामार्फत ट्रॅक्टर सबसिडी योजना (Tractor Subsidy Yojana) सुरू करण्यात आलेली आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीवर म्हणजेच 50% सबसिडी किंवा अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी दिलं जातं.

See also  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना | Rajiv Gandhi Student Accident Scheme in Marathi

ट्रॅक्टर सबसिडी योजना पात्रता

  • अर्जदाराचा आधारकार्ड असणे अनिवार्य
  • अर्जदाराच्या नावाने जमीन असावी
  • शेतकरी अनु. जाती किंवा अनु. जमातीतील असल्यास जातीचा दाखला असावा
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असल्यास अवजारांसाठी अनुदान मिळेल; पण त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा द्यावा लागेल.
  • एखाद्या घटकासाठी लाभ घेतल्यानंतर त्या लाभार्थ्यांना पूढील ५ वर्षासाठी परत लाभ घेता येणार नाही

ट्रॅक्टर सबसिडी कागदपत्र

  • आधारकार्ड
  • बँकेचा पासबुक
  • जातीचा दाखला
  • जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा
  • शेतातील पिकांची माहिती
  • लॉटरी लागल्यानंतर खालील कागदपत्र 👇
  • शेतकरी स्वयंघोषणापत्र
  • करारनामा
  • ट्रॅक्टर किंवा अवजारांचे बिल
  • पूर्वसंमती पत्र
  • टेस्ट रिपोर्ट
  • कोटेशन

ट्रॅक्टरसाठी अनुदान किती ?

ट्रॅक्टर अनुदानासाठी सामान्यता Capping पद्धतीनुसार एका निश्चित रुपयापर्यंत अनुदान मर्यादा ठरविण्यात आलेली असते. जश्याप्रकारे 8 एचपी पासून 70 एचपीच्या ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना एक लाख 25 हजार रुपये इतकी सबसिडी दिली जाते, तर 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टरसाठी 75 हजार रुपये इतकी जास्तीत जास्त सबसिडी किंवा अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येतं.

ट्रॅक्टरसह या यंत्रासाठी अनुदान

शेतकऱ्यांकडे अगोदरच ट्रॅक्टर असल्यास अवजारांसाठी अर्ज करता येईल व त्यासाठीसुध्दा अनुदान मिळविता येईल. योजनेतून कृषी यंत्र, अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. यात ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे, बैल चलित यंत्र, मनुष्य चलित यंत्र, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्टपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे इत्यादींचा समावेश आहे.

अर्ज कसा व कुठे करावा ?

शेतकऱ्यांना अर्ज महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या माध्यमातून करावा लागतो. त्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत ट्रॅक्टर या यंत्रासाठी अर्ज सादर करता येतो.

  • अर्जदाराला सर्वप्रथम MahaDBT च्या अधिकृत वेबसाईटवर जावावे लागेल.
  • होमपेज वरील नवीन नोंदणी (New Registration) या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्याठिकाणी तुमची संपूर्ण बेसिक माहिती भरा. जशाप्रकारे तुमचं संपूर्ण नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक इत्यादी
See also  mjpsky loan waiver : 50 हजार प्रोत्साहनपर कर्जमाफी कोणाला मिळणार ?
  • अशाप्रकारे तुमची मूलभूत नोंदणी संपूर्ण होईल. आता खालीलप्रमाणे तुम्हाला तुमचा युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.
  • लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा असा एक ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत तुम्ही ट्रॅक्टर यंत्रासाठी अर्ज करू शकता. अर्ज करत असताना ट्रॅक्टरचा एचपी, 2W, 4W काळजीपूर्वक टाका.
  • त्यानंतर अर्ज दाखला करतांना 23.60 पैसे ऑनलाईन पेमेंट करा. तुम्हाला अर्ज दाखल केल्याची पावती भेटून जाईल. काही दिवसांनी लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करून पुढील प्रक्रिया करून 50 टक्के अनुदान मिळू शकता.
  • ट्रॅक्टरसाठी अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान दिलं जात ?

    ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत अनुसूचित जाती व जमातीसाठी 50% तर खुल्या प्रवर्गासाठी 40% अनुदान दिलं जात.

  • ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?

    अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करावा लागतो.

  • ट्रॅक्टर अनुदानाअंतर्गत कोणकोणत्या घटकासाठी अर्ज करता येतो ?

    ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे, बैल चलित यंत्र, मनुष्य चलित यंत्र, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्टपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे इत्यादीं घटकासाठी अर्जदार आवश्यकतेनुसार अर्ज करू शकतात.