सावकारी कर्जमाफी योजना : या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ | Savkari Karjmafi Yojana

शेतकऱ्यांना संपूर्णतः उदरनिर्वाह करण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. यावर्षी प्रमाणेच दरवर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पुर इत्यादी संकटाना सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकरी उदरनिर्वाहासाठी, खत बी-बियाणे पेरणी इत्यादीसाठी सावकारी कर्ज काढतात. कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत जातो.

याच पार्श्वभूमीवर शासनाने १८ नोव्हेंबर २०२२ रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय काढलेला आहे. या शासन निर्णयामध्ये मराठवाडा व महाराष्ट्रातील कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीतून सुटका करण्यासाठी जवळपास ९.०४ कोटी इतकी रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सावकारी कर्जमाफी योजना 2022

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

सदर शासन निर्णयानुसार सावकारने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज हा योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते. त्या अनुषंगाने संदर्भातील शासन निर्णय क्र.१ मधील सादर अट रद्द करून ज्या सावकारांनी कार्यक्षेत्र बाहेर कर्ज वाटप केलेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची सावकारी कर्जमाफी करण्यासाठी शासन निर्णय क्र.२ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

Savkari Karjmafi Yojana GR

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात पूरक मागणीद्वारे मजुरी तरतुदीमधून रु. ४,२८,५९,०००/- इतका निधी वितरीत करण्यासाठी या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

निष्कर्ष : या शासन निर्णयाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेले असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनामार्फत निधी वितरणासाठीसुध्दा मान्यता देण्यात आली आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा शासनाचा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे.


📢 भूविकास बँकेची संपूर्ण कर्जमाफी जाहीर : येथे पहा

📢 शेतमाल तारण कर्ज योजना काय आहे : येथे पहा

See also  महाराष्ट्रातील 3 महत्वपूर्ण घरकुल योजना, कागदपत्रे, पात्रता, शेवटची तारीख, अर्ज