mjpsky loan waiver : 50 हजार प्रोत्साहनपर कर्जमाफी कोणाला मिळणार ?

mjpsky loan waiver : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये प्रोत्साहनपर कर्जमाफी देण्यासंदर्भात घोषणा करण्यात आल्या; परंतु अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, की मी कर्जमाफीसाठी पात्र असेल का ? किंवा कर्जमाफीसाठी पात्र आणि अपात्र कोण असतील ?

कर्जमाफी संदर्भातील आणखी एक प्रश्न म्हणजे ? शासनाकडून कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला; परंतु अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळत नाही ? mjpsky loan waiver

mjpsky loan waiver

शेतकरी मित्रांनो, या मागील मुख्य कारण म्हणजे बहुतांश जिल्ह्यातील बँकामार्फत चुकीची माहिती पुढे देण्यात आल्याकारणाने कर्जमाफीच्या प्रक्रियेला उशीर लागत आहे. याबाबतची सविस्तर माहिती काही दिवसापूर्वी आपल्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून माहिती वाचू शकता.

हे सुध्दा वाचा : 50 हजार कर्जमाफीसाठी या कारणाने उशीर ! शेतकऱ्यांची चुकीची माहिती पाठवण्यात आली. तुमचा जिल्हा आहे का ?

कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी कोण ?

  • 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2021 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीककर्ज व पूनर्गाठीत पीककर्ज होणार माफ !
  • कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हस्तांतरित ( Transfer ) करणार.
  • राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज आणि पूनर्गाठीत पीककर्ज होणार माफ !

कर्जमाफीसाठी अपात्र कोण ?

  • आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार तसेच खासदार
  • केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी ( मासिक 25 हजारपेक्षा जास्त वेतन असणारे – चतुर्थ श्रेणी वगळून )
  • महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी ( मासिक 25 हजारपेक्षा जास्त वेतन असणारे – चतुर्थ श्रेणी वगळून )
  • सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थेमध्ये मासिक 25 हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
  • 25 हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन उचलणाऱ्या व्यक्ती
  • शेती उत्पन्न व्यतिरिक्त इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती
See also  अरे बाप रे! कापसाला यंदा इतका भाव : kapas today rate maharashtra

वरील नमून पात्र व अपात्र अटीशिवाय इतर अटी व शर्ती नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये देण्यात आलेले आहेत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील शासन निर्णय डाऊनलोड करा. 👇