Types of Home Loan in Marathi | आपण किती प्रकारची गृहकर्जे घेऊ शकतो ?

Types of Home Loan in Marathi : मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्याला नवीन घर बांधण्यासाठी किंवा चालू घरामध्ये बदल करण्यासाठी गृहकर्जाची आवश्यकता भासते. पण अश्यावेळी आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारचं गृहकर्ज घ्यावे समजत नाही. कारण गृहकर्ज अनेक प्रकारात उपलब्ध असतात.

याबद्दलची माहिती बहुतांश कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना माहीत नसते. वेगवेगळ्या प्रकारची गृहकर्जे वेगवेगळ्या गरजेनुसार वापरता येतात. आजच्या लेखामध्ये आपण विविध प्रकारची गृहकर्ज व कर्ज घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ! याबदल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Types of Home Loan in Marathi

1. घर खरेदी कर्ज : तयार झालेली म्हणजेच बांधकाम करण्यात आलेले जुने किंवा नवीन घर खरेदीसाठी बँकेकडून कर्ज दिले जाते. यामध्ये मुखत्वे 2 प्रकार असतात. Floting व Fixed Home Loan व्याज प्रकार. या गृहकर्जामध्ये परतफेडीची मुदत 30 वर्षापर्यंत मिळते.

2. पूर्व मंजूर गृहकर्ज : घर खरेदी करण्याची क्षमता असलेल्या इच्छुक कर्जदारांना घर खरेदी करण्याच्या आधीच ही ऑफर दिली जाते. ज्याला आपण ” Pre-approval House Loan ” सुध्दा म्हणतो.

3. घर बांधणी कर्ज : तुमच्याकडे प्लॉट ( Plot ) असेल तर त्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी तुम्हाला बँकेमार्फत नवीन कर्ज मिळते. या कर्जाची परतफेड मुदत 15 वर्षापर्यंत असते.

हे सुध्दा वाचा : EMI कमी करण्याची 3 Best उपाय | 3 Best Methods to Reduce EMI

4. भूखंड ( Plot ) कर्ज : नवीन घर बांधण्यासाठी तुमच्याकडे भूखंड Plot म्हणजेच रिकामी जागा नसेल आणि ती जागा तुम्हाला घ्यायची असेल; तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नवीन प्लॉट खरेदीसाठी बँक कर्ज ( Bank Loan ) उपलब्ध करून देते. यातील कर्जाची रक्कम Plot ची किंमत व अर्जदाराच्या Credit Profile यावर अवलंबून असते.

See also  शिर्डी साईबाबा मंदिर फ्री ऑनलाईन दर्शन बुकिंग | Shirdi Sai Baba Mandir Free Online Darshan Booking

5. टॉप-अप कर्ज : तुम्ही अधिच जर गृहकर्ज घेतलं असेल, तर घेतलेल्या गृहकर्जावर हे कर्ज मिळते. या कर्जाचा उपयोग तुम्ही घराचे नूतनीकरण, व्यवसाय विस्तार, मुलांचे शिक्षण अथवा लग्नाचा खर्च इत्यादी कोणतीही बाबीसाठी वापरू शकता.

6. गृह विस्तार / नूतनीकरण : राहत्या घरामधे तुम्हाला काही नवीन बांधकाम, जसे जास्तीच्या खोल्या काढणे, फर्निचर, इंटेरियर डिझाईन इत्यादी नूतनीकरण करायचे असेल; तर याप्रकारचे कर्ज आपल्याला बँकेमार्फत दिलं जातं.

7. गृहकर्ज हस्तांतरण : तुमच्या सध्याच्या बँकेतील गृहकर्जापेक्षा इतर बँक कमी गृहकर्ज व्याज घेत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नव्या बँकेमध्ये तुमचे गृहकर्ज हस्तांतरित ( House Loan Transfer ) करू शकता. शिल्लक राहिलेल्या कर्जाचे नव्या बँकेमार्फत हस्तांतरण केले जाते.

कर्ज घेण्यापूर्वी काळजी घ्या !

  • bankbazar डॉट कॉमचे CEO यांच्यामार्फत सांगण्यात आले की, आपली गरज काय आहे ? यानुसार आपल्या कर्जाची निवड केल्यास आपल्याला कर्जचा अधिक फायदा होतो.
  • सहज उपलब्ध होणारे कर्ज व कमी व्याजदरावरील कर्ज या गोष्टीचा विचार करून कर्जाचा पर्याय निवडावा. बँक आपल्या क्रेडिट प्रोफाइल, बँकेतील मागील व्यवहार व अन्य गोष्टीचा विचार करून कर्ज उपलब्ध करून देते.
  • कर्ज घेण्यापूर्वी विविध बँका व वित्तीय संस्थांमध्ये कर्ज दरांची चौकशी करावी.
  • कर्ज घेताना कर्जासंदर्भातील संपूर्ण अटी व शर्ती वाचून घ्यावेत. म्हणजे कर्जपरतफेड करतेवेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

गृह कर्जाचे किती प्रकार असतात ?

गृह कर्ज म्हणजेच Home Loan चे सर्व प्रकार वरील लेखामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

कमी गृहकर्ज देणाऱ्या बँका कोणत्या आहेत ?

वरील लेखामध्ये EMI लिंक देण्यात आले आहे. त्यामधे कमी दराने गृहकर्ज देणाऱ्या बँकेची नावे आहेत.