गोगलगाय पीक नुकसान भरपाई मदत GR आला | Gogalgay Pik Nuksan Bharpai Madat Maharashtra 2022

गोगलगाय पीक नुकसान भरपाई मदत GR : नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील नुकसान भरपाई संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यामार्फत तक्रारी केल्या जात होत्या, की आमच्या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मदत संबंधी शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली नाही. कारण काही जिल्ह्यांमध्ये गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शासनामार्फत अद्याप कोणत्याही प्रकारचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले नव्हते; परंतु आज दिनांक 22 सप्टेंबर 2022 दिवशी चालू हंगामामध्ये गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.

गोगलगाय पीक नुकसान भरपाई मदत

शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी ! अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ त्याचप्रमाणे गोगलगायमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामामध्ये एकाच वेळेस मदत राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून देण्यात येते. राज्यात जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत द्यावी या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले व त्याबद्दलचे शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेले आहे.

Crop Loss Compensation For Crop Insurance

परंतु गोगलगायीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीसंदर्भात प्रश्न होताच ! तो प्रश्न आता सुटलेला आहे. चालू हंगामामध्ये लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गोगलगायमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या संदर्भातील निधी मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरून तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मदत द्यावी हे शासनाच्या विचाराधीन होते.

गोगलगाय पीक नुकसान भरपाई शासन निर्णय GR

चालू हंगामामध्ये लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये शंकी गोगलगायीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून एकंदरीत रक्कम ९८५८.८० ( रुपये 98 कोटी 58 लाख 80 हजार ) इतका निधी शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रात शेतकऱ्यांना वितरित करण्यासंदर्भात शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे.

See also  घरकुल योजना: ऑनलाइन आवेदन, Gharkul Yojana List, रमाई आवास योजना सूची

पीक नुकसान भरपाई वाढीव मदत खालीलप्रमाणे

ativrushti nuksan bharpai madat Maharashtra 2022
ativrushti vadhiv madat GR

नुकसान भरपाई जिल्हानिहाय विवरण

गोगलगाय पीक नुकसान भरपाई महाराष्ट्र 2022
शासन निर्णय डाऊनलोडयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप लिंकजॉईन करा !
Shetkari GR & What’s app Group

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पहा ! 👇