आता ग्रामपंचायतीनां याआधारेच मिळणार पुरस्कार | ग्रामविकासासाठी 9 संकल्पना | Grampanchayat Puraskar 2022-23

Grampanchayat Puraskar : केंद्रशासन व राज्य शासनामार्फत ग्रामविकासासाठी म्हणजेच गावपातळीवरील ग्रामपंचायतसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. कारण गावाचा विकास; तर तालुक्याचा विकास तालुक्याचा विकास; तर जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचा विकास; तर राज्याचा विकास अशा प्रकारची संकल्पना आहे. उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निधीच्या आधारे गावातील विविध क्षेत्रातील घटकांचा विकास केला जातो. जशाप्रकारे पाण्याची समस्या असेल, रोड-रस्त्याची समस्या असेल, खांबावरील दिवे असतील इत्यादी.

📢 ही माहिती देखील वाचा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनवाढ लागू, शासन निर्णय जाहीर

गावागावात यापुढील काळामध्ये नियोजनपूर्वक पद्धतीने गावातील विकास कामे राबवली जाणार असून त्यासाठी नवीन 9 संकल्पना निश्चित करण्यात आले आहेत. केंद्रीय पंचायत राज्य विभागाने याबाबतच्या प्रशिक्षणाला सुद्धा सुरुवात केलेली असून यापुढे ग्रामविकासासाठी मिळणारे केंद्रीय पुरस्कार ( Grampanchayat Puraskar ) ही याच संकल्पनांच्या अंमलबजावणीवर आधारित असणार आहे.

Grampanchayat Puraskar आता याआधारेच मिळणार

आत्तापर्यंत खेड्यापाड्यातील गावांचा विकास म्हणजे फक्त रस्ते, नाली, गटारी आणि पाणी इत्यादीपर्यंत मर्यादित असायचे; परंतु गेल्या काही वर्षापासून यामध्ये बदल होऊन गावपातळीवरसुद्धा ग्रामविकासाच्या माध्यमातून विविध अशा योजना, संकल्पना राबविल्या जात आहेत. त्या दृष्टीने गावातील सर्व वयोगटातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी या 9 संकल्पनांचा आग्रह केंद्रीय पंचायत राज विभागाने धरला आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशभरातील ग्रामपंचायतींना पंडित दीनदयाळ पंचायत राज सशक्तिकरण पुरस्कार व अन्य विविध पुरस्कार दिले जातात; परंतु आता हे पुरस्कार ग्रामपंचायतीला द्यावे की नाही ? हे नवीन निर्धारित केलेल्या 9 संकल्पनांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे.

ग्रामविकासासाठीच्या 9 संकल्पना खालीलप्रमाणे आहेत.

  1. जलयुक्त गाव
  2. स्वच्छ व हरित गाव
  3. पायाभूत सुविधापूर्ण स्वयंपूर्णगाव
  4. सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव
  5. सुशासन व प्रशासनयुक्त गाव
  6. महिला विकासाला पूरक गाव
  7. आरोग्यदायी गाव
  8. बालविकासाला पूरक गाव
  9. समृद्ध गाव

शासनामार्फतचा हा संकल्प खूपच चांगला आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळावा या हेतूने वरील नमूद सर्व क्षेत्रातील कामाचा विकास केला जाईल. परिणामी गावातील पाण्याची समस्या, स्वच्छता, सुविधा, सुशासन, प्रशासन, आरोग्य व शिक्षण या संबंधित क्षेत्राचा विकास होऊन ग्रामपंचायत व गावातील नागरिक सर्व बाजूने सक्षम होतील.

See also  Credit Card मधून कॅश काढावी का ? | Cash Withdraw From Credit Card is it Worth ?