Credit Card मधून कॅश काढावी का ? | Cash Withdraw From Credit Card is it Worth ?

Cash Withdraw From Credit Card : मित्रांनो, हल्ली सगळ्यांकडे Credit Card असल्याचे आपल्याला आढळून येते, जवळपास 10 व्यक्तीपैकी 2 ते 3 व्यक्तींकडे क्रेडिट कार्ड नक्कीच आहेत. पण क्रेडिट कार्डचा वापर करत असताना तुम्ही कधी Atm Machine मधून पैसे काढले आहेत का ?

Cash Withdraw From Credit Card

सणासुदीच्या काळात जश्याप्रकारे दिवाळी व दसऱ्यानिमित्त आपण मोठ्या ऑनलाईन व ऑफलाईन खरेदी मोठ्या प्रमाणावर करतो. खरेदीसाठी सामान्यता क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम सुद्धा काढता येते. परंतु याचे दुष्परिणामसुद्धा आहेत. त्याचे फायदे व धोके काय हे जाणून घेऊ.

Credit Card वर सवलत काय असते ?

Credit Card चा ऑफलाईन किंवा ऑनलाईन वापर करत असताना आपल्याला भरपूर अश्या सुविधा व सवलती दिल्या जातात. ज्यामध्ये क्रेडिट कार्डवर Reward Points, Cashback व इंधन अधिभार माफिसह अनेक सवलाती दिल्या जातात.

हे सुध्दा वाचा : आपण किती प्रकारची गृहकर्ज ( Home Loan ) घेऊ शकतो ? याबदलची माहिती नक्की पहा!

वरील मुख्य कारणामुळे ग्राहक Credit Card कडे वळतात. परंतु या सर्व सुविधा व्यतिरिक क्रेडिट कार्डवरून ग्राहकांना आगाऊ रोख रक्कम सुद्धा काढता येते. या सुविधेमुळे ग्राहक अडचणीच्या वेळी आपल्याकडे कार्डच्या मदतीने उपक्रम काढू शकतात.

See also  अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 शासन निर्णय आला | Ativrushti Nuksan Bharpai 2022 GR Declared

Credit Card वरून पैसे काढावेत का ?

  • क्रेडिट कार्डवरुन पैसे काढल्यानंतर भरणा करताना तुम्हाला खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे हा पर्याय तुमच्याकडे तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल, तर वापरावा अथवा फक्त आपत्कालीन काळातच Credit Card वरील Cash Withdraw From Credit Card चा वापर करावा.
  • जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तरच क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम काढण्याचा विचार करावा. रोख रक्कम काढल्यानंतर स्वतः महत्त्वाची काळजी घ्यावी. ती म्हणजे लवकरात लवकर क्रेडिट कार्ड बिलिंग रक्कम भरून टाकावी. जर शक्य असेल, तर तारखेपूर्वीच ही रक्कम भरावी.

Credit Card वरून पैसे काढल्यास काय नुकसान होणार ?

क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम काढल्याने क्रेडिट कार्डधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते, ज्यामध्ये खालील नुकसान मुख्यत्वे लक्ष्यात घेण्यासारखे आहेत.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम ( Effect On Cibil Score )

रोख रक्कम काढण्याची सुविधा फक्त आणीबाणीच्या काळातच वापरण्यासाठी आहे. कारण नको त्या वेळी रक्कम काढल्यास खूप व्याज आकारला जातो. त्याचप्रमाणे आपल्या Cibil Score वर सुध्दा वाईट परिणाम होतो; परिणामी आपल्याला भविष्यकाळ लोन, कर्ज, क्रेडिट कार्ड घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.

लिमिट मर्यादापेक्षा रक्कम काढू नये

साधारणतः बँकेकडून ग्राहकांना क्रेडिट लिमिटच्या 30% ते 40% रोख रक्कम काढण्याची मर्यादा देण्यात आलेली असते. पण तुम्ही जर त्यापेक्षा जास्त रक्कम काढलात तर तुम्हाला जास्त Penality भरावी लागते. उदाहरणार्थ, तुमच्या काढील क्रेडिट कार्डची मर्यादा 1 लाख रुपये असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त 30 ते 40 हजार रुपये रोख रक्कम काढू शकता.

रोख रक्कम काढल्यास इतका व्याज

Credit Card वरून रोख रक्कम काढल्यास बहुतांश बँकांमार्फत 36 ते 40% वार्षिक व्याजदर आकाराला जातो. त्यामुळे क्रेडिट कार्ड धारकांना रोख रक्कम काढणे खूपच महागात पडू शकते.

Credit Card वरून पैसे काढल्यास किती शुल्क लागतो ?

क्रेडिट कार्डमधून रोख आगावू रक्कम काढल्यास व्याजासह इतर अतिरिक्त शुल्क ही आकारली जातात. ज्यामध्ये Processing Fee, Annual Fee, Other Charges अश्या प्रकारची शुल्क आकारली जातात. रोख रकमेच्या 2.5 ते 3% पर्यन्त हा शुल्क असू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 लाख रुपये तुमच्या क्रेडिट कार्डवरून काढलात, तर त्यासाठी तुम्हाला बँक 2 ते 3 हजार रुपये आकारू शकते. त्याचप्रमाणे काढलेल्या रक्कमेवर दरमहा 3.5 टक्के दराने व्याज आकारला जातो.

क्रेडिट कार्डवरून फ्रीमध्ये पैसे काढता येतात का ?

नाही

क्रेडिट कार्डचे पैसे atm मधून काढता येतात का ?

हो, पण त्यासाठी चार्जेस आकारले जातात.

क्रेडिट कार्डवरून जास्तीत जास्त किती रुपये काढता येतात ?

बँकेकडून एक निश्चित रोख रक्कम काढण्याची मर्यादा दिली जाते, त्यानुसार रक्कम काढता येते. सामान्यता बँका क्रेडिट कार्डच्या एकूण लिमिटच्या 30 ते 40 टक्के रोख रक्कम काढण्यासाठी मुभा देतात.