दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2023 जाहीर | HSC SSC Board Exam Timetable 2023 Declared

HSC SSC Board Exam Timetable 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्ही दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा वेळापत्रक कधी येणार म्हणून वाट पाहत असाल ? तरी या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. उत्साहाने आता परीक्षेच्या तयारीला लागा; कारण HSC व SSC बोर्ड परीक्षेचा वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. वेळापत्रक कश्याप्रकारे असेल याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

दरवर्षी फेब्रुवारी-मार्च या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, लातूर, अमरावती, नाशिक, कोकण, कोल्हापूर या एकूण 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात येतात.

HSC SSC Board Exam Timetable 2023

दरवर्षाप्रमाणेच या वर्षीसुद्धा फेब्रुवारी-मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत वरील नमूद 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात येणार असून त्यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे. 10 वी 12 वी म्हणजेच HSC व SSC चा लेखी संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे.

इयत्ता 12वी ( HSC ) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वेळापत्रक

मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून सोमवार दिनांक 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये इयत्ता बारावीच्या (HSC) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा संभाव्य वेळापत्रक असेल.

इयत्ता 10वी ( SSC ) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वेळापत्रक

गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 पासून शनिवार दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीमध्ये इयत्ता दहावीच्या (SSC) माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा संभाव्य वेळापत्रक असेल.

HSC SSC Board Exam Timetable 2022
HSC SSC Board Exam Timetable 2022

उपरोक्त नमूद करण्यात आलेले संभाव्य HSC SSC Board Exam Timetable 2023 आयोजित केलेली दिनांक निहाय सविस्तर मंडळाच्या www.mahahsscboard.in वेबसाईटवर दिनांक 19/09/2022 पासून दहावी बारावी वेळापत्रक 2023 PDF सुरुवात उपलब्ध करून देण्यात येईल.

See also  प्लास्टिकचे स्मार्ट आधार कार्ड अवैध ! 50 रु. मध्ये मागवा मूळ Smart Card | Order Aadhar Smart Card Online at 50 Rs.

हे सुध्दा वाचा : विद्यार्थ्यांसाठीची स्वाधार योजना काय आहे ? याच विद्यार्थ्यांना मिळणार 51,000 रु. मदत

शाळा / कनिष्ठ महाविद्यालय त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे योग्यरीत्या नियोजन करता येईल व या नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होईल. हा दृष्टांत विचारात घेऊन दहावी बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2023 जाहीर

मंडळाच्या वेबसाईटवरील अंदाजीत वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षा होण्यापूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे देण्यात येणारे छापील स्वरूपातील वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य वेबसाईटवरील किंवा आणि यंत्रणेने छपाई केलेले त्याचप्रमाणे व्हाट्सअप किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

सदर वेळापत्रकाबाबत काही महत्त्वाच्या सूचना अथवा हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे पंधरा दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठविण्यात याव्यात. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, गुणांची श्रेणी, व आणि विषयांचे वेळापत्रक स्वातंत्रपणे परीक्षा होण्यापूर्वी मंडळामार्फत शाळा0/ कनिष्ठ महाविद्यालय / उच्च माध्यमिक विद्यालय यांना कळविण्यात येईल.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2023 PDF

दहावी (SSC) Board वेळापत्रक PDFयेथे क्लिक करा
दहावी (HSC) Board वेळापत्रक PDFयेथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा !येथे क्लिक करा
marathi what’s app group