या नागरिकांना आता एस-टी चा मोफत प्रवास शिंदे सरकारची घोषणा | Senior Citizen ST Bus Scheme

Senior Citizen ST Bus Scheme : ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60-65 वयोगटातील नागरिक. अश्या नागरिकांसाठी शासनामार्फत विविध योजना जश्याप्रकारे पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धाश्रम योजना, मातोश्री वृद्धाश्रम योजना, ज्येष्ठांना ओळखपत्र देणे, संजय गांधी निराधार योजना इत्यादी योजना राबविल्या जातात. याच नागरिकांना कमी सवलत दरावर प्रवास करता यावा म्हणून एसटी स्मार्ट कार्ड ( ST SMART CARD ) चालू करण्यात आले. ज्यामुळे 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची मुभा होती.

Senior Citizen ST Bus Scheme ( जेष्ठ नागरिक मोफत ST प्रवास योजना )

आता शिंदे सरकारमार्फत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सोयीस्कर व सवलतीचा व्हावा म्हणून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे 75 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत ( ST ) चा प्रवास. यापुढे महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत असणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात 50 टक्के सवलत होती; परंतु यापुढे जे जेष्ठ नागरिक स्त्री अथवा पुरुष ज्यांचे वय 15 ऑगस्ट 2022 दिवशी 75 वर्ष झालेले असेल त्यांना मोफत प्रवास सुविधा दिली जाणार आहे.

ही बाब वेगळी आहे की, अद्याप त्याबद्दलची माहिती अथवा आदेश महामंडळ विभागाला आणखी देण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील एसटी महामंडळ कर्मचारी त्याचप्रमाणे जनसामान्य ज्येष्ठ नागरिकसुद्धा या संदर्भातील आदेशाची वाट पाहत आहेत. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंच्याहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शिंदे सरकारनी खुश केलं आहे. Senior Citizen ST Bus Scheme या संदर्भातील अद्याप संपूर्ण माहिती जशाप्रकारे योजनेचे स्वरूप लाभार्थी प्रकार कागदपत्राची पूर्तता याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. लवकरच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल आणि त्यानुसार जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

See also  यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | Yashwantrao Chavan Mukt Vasahat Yojana

📢 हे सुध्दा वाचा : ” मेरी पहचान सरकारी ” योजनांचे नवीन पोर्टल. आता एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती

महाराष्ट्र राज्यात ६५ वर्षाहून अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना सध्यास्तिथिमध्ये प्रवासभाड्यात ५० टक्के तर शिवशाही बसमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. मात्र आता स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त ७५ वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

सौजन्य : लोकमत न्युज पेपर

नेमकं एसटीच्या सवलती कोणासाठी असतात ?

एस टी महामंडळ मार्फत समाजातील अनेक नागरिकांना विशेषत: विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला, आधिस्वीकृतीधारक पत्रकार, दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह जवळपास समाजातील 29 घटकांना एसटी प्रवासात 33 टक्यापासून 100 टक्केपर्यंत सवलत दिली जाते. 31 ऑगस्टनंतर या सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे.

योजना७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
सुरुवातराज्य सरकार
लाभार्थीजेष्ठ नागरिक
शासन निर्णयअद्याप निर्गमीत नाही
अधिकृत वेबसाईटhttps://msrtc.maharashtra.gov.in/

जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास केव्हापासून करता येईल ?

अद्याप शासन निर्णय आलेला नाही, त्यामुळे जोपर्येंत शासन निर्णय आणि पुढील निर्देश येणार नाहीत तोपर्येंत वाट पाहावी लागेल.

मोफत ST बस प्रवासासाठी कोण पात्र असतील ?

१५ ऑगस्ट २०२२ दिवशी ज्यांचे वय ७५ वर्ष पूर्ण झाले असेल, असे सर्व नागरिक.