यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | Yashwantrao Chavan Mukt Vasahat Yojana

Yashwantrao Chavan Mukt Vasahat Yojana : मित्रांनो, दारिद्र्यरेषेखाली मोडणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला निवारा म्हणजेच राहण्यासाठी घराची आवश्यकता असते; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे अशा नागरिकांना घर उपलब्ध होत नाही. शासनामार्फत विविध आवास योजना (Government Schemes) राबविल्या जातात ज्याअंतर्गत गरजू नागरिकांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध करून दिला जातो.

आज आपण धनगर समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजने संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. धनगर समाजासाठी राबविण्यात येणारी वसाहत योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना होय.

शासनामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अटी लागू करून धनगर समाजातील पात्र व वंचित कुटुंबासाठी घरकुल योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना १ लाख २० हजाराचे अनुदान घरकुल बांधकामासाठी शासनामार्फत या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं जाईल.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (Yashwantrao Chavan Mukt Vasahat Yojana)

धनगर समाजातील बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने दहा हजार घरकुल देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून यासंदर्भात अमलबजावणीसुद्धा होत आहे.

अर्ज कसा करावा ?

शासन निर्णयानुसार नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून विहित नमुन्यामध्ये धनगर समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे सादर करावा. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

योजनेसाठी पात्रता व अटी

या योजनेसाठी लाभार्थ्यांना जातीचा दाखला आधार कार्ड एक लाख वीस हजार पर्यंत वार्षिक उत्पन्नाचा दाखला अल्पभूधारक असल्याचा दाखला रहिवास दाखला रेशन कार्ड आणि सोबतच शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कोणत्याही घरकुल चा लाभ न घेतल्या बाबतचे हमीपत्र अर्जासोबत द्यावी लागतील

See also  घरबसल्या फुकटात करा आता ई फेरफार | e ferfar Online Process Maharashtra

चार हप्त्यात मिळणार १ लाख २० हजार रुपये

विविध योजनेप्रमाणेच या योजनेमध्ये सुद्धा पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम हक्कांमध्ये दिली जाईल धनगर समाजातील लाभार्थी चार हप्त्यात एक लाख वीस हजार रुपये घरकुल बांधव बांधकामासाठी मिळू शकतील याबाबतची माहिती समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.


📢 राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना : येथे पहा

📢 पीएमएफएमई योजना काय आहे : येथे पहा