अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 शासन निर्णय आला | Ativrushti Nuksan Bharpai 2022 GR Declared

ativrushti nuksan bharpai 2022 : शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे. अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यासंदर्भातील जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय 12 ऑगस्ट 2022 व बागायत व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ 16 ऑगस्ट 2022 दिवशी घेण्यात आलेला होता.

पण त्यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका होती की, आम्हाला पीक नुकसान भरपाई ( Crop Loss Cover ) केव्हा मिळेल ? आज दिनांक 22 ऑगस्ट 2022 दिवशी अतिवृष्टी व पुर यामुळे जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे जे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ते नुकसान वाढीव दराने देण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत 200 ( ativrushti nuksan bharpai madat 2022 )

अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास अशा शेतकऱ्यांचे मनोबल वाढवून पुढील हंगामासाठी तितक्याच जोमाने शेतकऱ्यांना शेतामध्ये कष्ट घेता यावे याकरिता निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामामध्ये एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ( SDRF ) विहीत आणि मदत देण्यात येते, तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीनुसार मदत देण्यात येते. राज्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

📢 हे सुध्दा वाचा : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आता हेक्टरी 13,600 रुपये भेटणार महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय

See also  उत्पन्नाचा दाखला व जिवंत असल्याचा दाखला दिलात तरच मिळतील पैसे ! Indira Gandhi, Shravan Bal, Niradhar Yojana Update

ही नुकसान भरून काढता यावी, म्हणून बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतातील इतर नुकसानी करिता मदत देण्याबाबत दिनांक 10 ऑगस्ट 2022 दिवशी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली होती. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन होता.

ativrushti nuksan bharpai Maharashtra 2022

जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमधील अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई बद्दलचा वाढीव दराने मिळणार मोबदला खालीलप्रमाणे आहे आणि त्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

ativrushti nuksan bharpai madat Maharashtra 2022
Pik Nuksan Bharpai Madat list Maharashtra 2022

अतिवृष्टी नुकसान भरपाई GR संदर्भातील महत्त्वाच्या बाबी

  • शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानाव्यतिरिक इतर बाबीकरिता संदर्भाधीन क्र.2 शासन निर्णयअन्वे निश्चित केलेल्या दरानुसार मदतीचे वाढू दर लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
  • राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये विहित निकषाव्यतिरिक अथवा ठराविक दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरण पत्रात दाखवल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीमधून खर्च करण्यात येईल.
  • मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अटी व शर्ती लागू असते.
  • शेती पिकांचे नुकसानी करिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान देय असेल.
  • पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच निधी वितरित करण्यात येऊन लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करावी.
  • लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात यावा.

तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांच्या हितार्थ पीक नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. लवकरच यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम हस्तांतरित करण्यात येईल. या संदर्भातील काही अपडेट असतील तर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पहा. 👇👇

हेक्टरी किती अनुदान किंवा नुकसान भरपाई मदत दिली जाणार आहे ?

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,600, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27,000 व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36,000 प्रती हेक्टर याप्रमाणे मदत शासनामार्फत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.