अतिवृष्टी नुकसान भरपाईतून वगळलेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासादायक निर्णय | ativrushti nuksan bharpai jahir

नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ! चालू वर्ष 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परंतु निकषानुसार अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 जाहीर

चालू वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, गोगलगाय या मुख्य कारणामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 8 सप्टेंबर 2022 दिवशी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला होता, जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटी रुपये इतक्या निधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे गोगलगायीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 98 कोटी रुपयांसाठीचा निधी मंजूर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 12 सप्टेंबर 2022 दिवशी घेण्यात आला.

ativrushti nuksan bharpai jahir

जून ते ऑगस्ट कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित 6 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीसाठीनुसार ठरविण्यात आलेल्या नियम व अटीमध्ये बसत नसलेल्या पण अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय काल घेण्यात आला.

हे सुध्दा वाचा : गोगलगायीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा शासन निर्णय आला ! 98 कोटी 58 लाख 80 हजार रुपयांची मदत जाहीर

जवळपास 755 कोटी रुपयांची मदत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये काल दिनांक 29 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णय यामुळे राज्यातील 5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अप्पर मुख्य सचिव ( वित्त विभाग ) मनोज सैनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

See also  गोगलगाय पीक नुकसान भरपाई मदत GR आला | Gogalgay Pik Nuksan Bharpai Madat Maharashtra 2022

या निर्णयामुळे खालील बाधित जिल्ह्यांना होणार मदत

  • औरंगाबाद – 12679 हेक्टर बाधित क्षेत्र
  • जालना – 678 हेक्टर बाधित क्षेत्र
  • परभणी – 2545.25 हेक्टर बाधित क्षेत्र
  • हिंगोली – 96677 हेक्टर बाधित क्षेत्र
  • बीड – 48.80 हेक्टर बाधित क्षेत्र
  • लातूर – 213251 हेक्टर बाधित क्षेत्र
  • उस्मानाबाद – 112609.95 हेक्टर बाधित क्षेत्र
  • यवतमाळ – 36711.31 हेक्टर बाधित क्षेत्र
  • सोलापूर – 74446 हेक्टर बाधित क्षेत्र

एकूण बाधित क्षेत्र :- 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र

एकूण निधी :- जवळपास 755 कोटी रुपये ( ativrushti nuksan bharpai jahir )