उत्पन्नाचा दाखला व जिवंत असल्याचा दाखला दिलात तरच मिळतील पैसे ! Indira Gandhi, Shravan Bal, Niradhar Yojana Update

केंद्र व राज्यशासन पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाद्वारे राज्यातील विविध वर्गातील वयोवृद्ध, विधवा, अपंग इत्यादी कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार योजना इत्यादी योजनांचा लाभ निराधारांना दिला जातो.

Indira Gandhi, Shravan Bal, Niradhar Yojana Update

परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ह्यातीचा दाखला म्हणजेच जिवंत असल्याचा ( Life Certificate ) दाखला त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला ( Income Certificate ) देणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या लाभार्थ्यांना ( Beneficiary ) दाखला दिल्याशिवाय दरमहा येणारी अनुदान रक्कम ( Subsidy Amount ) मिळणार नाही अशा प्रकारची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

या महिन्यापासून अनुदान बंद

केंद्र व राज्यशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या ह्यातीचा दाखला (Life Certificate) व उत्पन्नाचा दाखला (income certificate) वेळेमध्ये जमा न केल्यास सप्टेंबर महिन्याचे अनुदान व निवृत्तीवेतनची रक्कम लाभार्थी व्यक्तींच्या बँक खात्यात ( Bank Account ) जमा होणार नसल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.

बहुतांश जिल्ह्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतनचे लाभार्थी नाहीत; कारण हा लाभ मिळवण्यासाठी 80 टक्के अपंगत्व असणे आवश्यक आहे. राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 40 टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास अनुदानाला पात्र ठरविण्यात येत आहे.

जिल्ह्यात एक लाख लाभार्थी

राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसह इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार अनुदान इत्यादी योजनांचे विविध जिल्ह्यांमध्ये लाखांमध्ये लाभार्थी आहेत. केंद्र व राज्यपुरस्कृत योजनांचा लाभ या लाभार्थ्यांना दरमहा मिळत आहे. काही वेळा दोन ते चार महिन्याची अनुदान रक्कम ( Subsidy Amount ) या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी जमा होत असल्याचा अनुभव आहे.

See also  या तारखेला येणार PM-KISAN 2000 रु. चा हफ्ता | PM-Kisan Scheme Next Installment Date

निराधार योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाचा दाखला ?

निराधार लाभार्थ्यांना अनुदान रकमेचा लाभ घेता यावा, यासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करण्याची अट आहे परंतु अद्याप काही लाभार्थ्यांनी अजूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे आढळून येत आहे.

जिवंत असल्याचा दाखला आवश्यक

केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना लाभार्थी जिवंत असल्याचा दाखला संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे जमा करणे अपेक्षित आहे अन्यथा लाभार्थ्यांना या रकमेचा लाभ घेता येणार नाही. बहुतांश लाभार्थ्यांनी अद्याप हा दाखला दिले नसल्याचे दिसत आहे.

अटी व शर्ती

  • केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमधील असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी घरातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील प्रमुख कमाईदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या मृताच्या कुटुंबाला किंवा वारसाला 20 हजारांचे अर्थसहाय्य मदत दिले जाते.

निधी व खर्च

मार्च अखेरपर्यंत 93 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 179 लाभार्थ्यांना लाभ मिळाला. त्यासाठी तब्बल 35 लाख 80 हजारांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे.

इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ गेल्या वर्षी 4 हजार 202 लाभार्थ्यांनी घेतला आहे. यासाठी 4 लाख 96 हजार 800 रुपयांचा निधी खर्च झाला आहे. याव्यतिरिक्त श्रावणबाळ योजनेसाठी मार्च अखेर 5 हजार 376 कुटुंबातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे व त्यासाठी एकंदरीत 84 लाख 62 हजाराचा निधी खर्च झालेला आहे.

संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, वृद्धपाकळी योजना, अपंग योजना इत्यादीसाठी उत्पन्न आणि हयातीचा दाखला लागेल का ?

हो, प्रशासकीय अधिकारीमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांना उत्पन्न व हयातीचा दाखला दाखल करावा लागेल अन्यथा लाभ रक्कम दिली जाणार नाही.

हयातीचा दाखल व उत्पन्न दाखल न दिल्यास काय पगारी बंद होतील ?