आता मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करावे लागणार | How to Link Voting Card to Aadhar Card Online

Link Voter Card to Aadhar Card Online : लवकरच आपले मतदान कार्ड आता आपल्या आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य होणार आहे. यासंदर्भात लोकसभेत आज विधेयकसुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे.

Voter Card Link to Aadhar Card Online

आज लोकसभेत केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू यांच्यामार्फत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर करण्यात आले. या विधेयकाच्या आधारे लोकप्रतिनिधी कायदा १९५० आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये अंशतः बदल करण्यात आलेले आहेत.

निवडणूक सुधारणेच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जात आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रीमंडळाने या सुधारणा विधेयक बदलांना मंजुरी दिली होती. सध्या ही बाब त्याची किंवा पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. या विधेयकाच्या बदलामुळे नागरिकांना त्यांचे मतदान कार्ड आधार कार्डशी जोडण्याचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे वैयक्तिक मतदारांची एक स्वतंत्र ओळख निर्माण होईल. या विधेयकामुळे मतदार यादीमधील बोगस मतदारला आळा बसणार आहे आणि हे रोखण्यासाठी मतदान कार्डला आधारकार्ड लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

मतदान ओळखपत्रबद्दल महत्त्वाच्या दुरुस्त्या

  • 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते, पण ही प्रक्रिया वर्षभरामध्ये एकदा म्हणजेच जानेवारी महिन्यात होत असे. ती आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोंबर या चार महिन्यांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे नव्या मतदारांना यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही.
  • नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या पुरुष ‘ सर्विस वोटर’ त्यांच्या वतीने मतदान करण्यासाठी पत्नीला नामांकित करता येत होते, त्याचप्रमाणे आता पत्नीला सुद्धा वोटर म्हणून पतीला नामांकित करता येणार आहे. Wife ऐवजी Spouse असा शब्दप्रयोग केला जाईल.
See also  आता घरपोच मिळवा हयातीचा दाखला | Now Get Life Certificate at Home