आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजना | Ayushman Bharat Yojana Online Application

Ayushman Bharat Yojana : मित्रांनो, जनसामान्य नागरिकांना योग्य प्रकारे वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. ज्यामधील दोन महत्त्वकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आपण ज्याला आयुष्यमान भारत योजना सुद्धा म्हणतो त्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजना

Ayushman Bharat Yojana Maharashtra 2022

आज आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जशाप्रकारे आयुष्मान कार्ड कसे काढावे ? यासाठीची पात्रता, लागणारी कागदपत्रे ,लाभार्थी, उपचार इत्यादी

आयुष्मान भारत योजना काय आहे ?

तळागाळातील गोरगरीब नागरिकांना विविध आजारावरील शस्त्रक्रियेसाठी पाच लाखापर्यंत शासनाकडून मोफत उपचार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून केले जातात. ज्यामध्ये नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात येतं त्या कार्डच्या माध्यमातून पात्र लाभार्थी नमूद दवाखान्यामध्ये जाऊन या योजनेचा लाभ मिळू शकतात.

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कसे काढावे ?

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना pmjay.gov.in या वेबसाईटवर आधार क्रमांक टाकून आयुष्मान कार्ड काढता येतो.

आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील सर्व व्यक्ती किंवा नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.

पाच लाखापर्यंत मोफत उपचार

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना 3.50 लाख आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत १.५० लाख असे एकूण पाच लाखापर्यंत मोफत उपचार Ayushman Bharat Yojana अंतर्गत येणाऱ्या व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या दवाखान्यांमध्ये केले जातात.

आयुष्मान भारत कार्ड पात्रता व कागदपत्र

आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी 18 वर्ष पूर्ण असावे आणि सोबतच लाभार्थी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील असावा.

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शिधापत्रिका
  • नोंदणी करत मोबाईल क्रमांक

आयुष्मान भारत कार्ड ऑनलाइन कसे काढावे ?

  • सर्वप्रथम यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्थ्यांनी pmjay.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. लाभार्थी पात्र असल्यास तुमचा आयुष्यमान कार्ड तुम्हाला भेटेल.
  • तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुमच्या अंगठ्याचा ठसा देऊनसुद्धा आयुष्मान कार्ड काढू शकता. यामध्ये तुम्हाला सीएससी केंद्रावरील केंद्र चालक मदत करतील.
  • सोबतच जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य केंद्रावरसुद्धा नागरिक ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून आयुष्मान कार्ड मिळू शकतात.
See also  E-Shram Card Information in Marathi : ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करा दोन लाखापर्यंत लाभ मिळवा !