डॉ. बाबासाहेब जीवन प्रकाश योजना 2022 ऑनलाईन अर्ज, पात्रता व लाभार्थी यादी | Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana Marathi

Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana : मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेबद्दल आपण अधिक माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत, जसे योजनेबद्दल माहिती, पात्रता, लागणारी कागदपत्रे, लाभार्थी यादी इत्यादी. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

देशातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी सरकार सतत नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुदृड करण्याचा शासनाचा हेतू असतो. नुकतीच शासनामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना चालू करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. Dr Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana च्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील नागरिकांना मोफत विद्युत जोडणी देण्यात येईल.

Dr Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana 2022

महाराष्ट्र शासनामार्फत Dr Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या नागरिकांना विशेषता घरगुती वीज कनेक्शन दिले जाईल. या योजनेची सुरुवात 10 एप्रिल 2022 दिवशी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यामार्फत करण्यात आली. राज्याचे ऊर्जा विभागामार्फत यासंदर्भात अधिकृत शासननिर्णय सुद्धा चालू करण्यात आला. ही योजना 6 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यशील असेल. लाभार्थ्यामार्फत या योजनेचा लाभ घेण्यासाठी 500 रुपये रक्कम जमा करावी लागेल, ही रक्कम पाच हप्त्यांमध्ये सुद्धा दर माह 1 हफ्ता यानुसार भरता येईल. योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार Online किंवा offline दोन्ही पद्धतीचा अवलंब करू शकतात.

See also  वनहत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी अर्थसहाय्य अनुदान योजना | वन्यप्राणी पीक नुकसान भरपाई योजना महाराष्ट्र

जीवन प्रकाश योजना 15 दिवसाच्या आत वीज कनेक्शन जोडणी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचा पूर्वीचा कुठल्याही प्रकारचा बिल थकीत नसावा. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत वीज जोडणी करून दिली जाईल. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी महावितरण, जिल्हा नियोजन विकास समिती व अन्य माध्यमातून निधी उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेअंतर्गत जळगाव भागातील क्षेत्रामध्ये 633 ग्राहकांना वीज कनेक्शन देण्यात आलेला आहे. योजनेचा लाभ फक्त तीच लाभार्थी घेऊ शकतात ज्यांच्याजवळ विद्युत जोडणी नसेल.

Highlights of Dr Babasaheb Ambedkar jivan Prakash Yojana 2022

योजनेचे नावडॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना
योजनेची सुरुवातGovernment Of Maharashtra
लाभार्थीमहाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिक
उद्देशमोफत विद्युत जोडणी करून देणे
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज पद्धतीऑनलाईन/ऑफलाईन
योजनेअंतर्गत राज्यमहाराष्ट्र
देय रक्कम५०० रुपये

Dr Babasaheb Ambedkar jivan Prakash Yojana 2022 चे उदिष्ट

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अशा नागरिकांना विद्युत कनेक्शन देणे, ज्यांच्याजवळ पूर्वीपासून वीजजोडणी नसेल. शासनामार्फत या योजने अंतर्गत मोफत विद्युत जोडणी लाभार्थ्यांना दिली जाईल. फक्त लाभार्थ्यांना 500 रुपये रक्कम देय करावी लागेल. ही रक्कम लाभार्थी 5 हिश्यामध्येसुद्धा भरू शकतात. ही योजना राज्याच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या नागरिकांना त्यांच्या राहणीमानाचा स्तर व स्वाभिमान तसेच आत्मशक्ती प्रदान करेल.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना फायदे व वैशिष्ट्य

  • महाराष्ट्र शासनामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरू करण्यात आली.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील scheduled caste व scheduled tribe प्रवर्गातील नागरिकांना प्राधान्य देऊन घरगुती वीज जोडणी मोफत दिली जात आहे.
  • या योजनेची सुरुवात करण्याची घोषणा 10 एप्रिल 2022 दिवशी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यामार्फत करण्यात आली.
  • राज्याचे ऊर्जा विभागामार्फत या संबंधित शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला.
  • शासनामार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2022 पासून ही योजना सुरू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली.
  • या योजनेसाठीचा कार्यकाल 6 डिसेंबर 2022 पर्यंत असेल.
  • लाभार्थीमार्फत या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थ्यांना 500 रुपये रक्कम जमा करावी लागेल. ही रक्कम लाभार्थी हप्त्यांमध्ये सुद्धा भरू शकतात.
  • योजनेअंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावाने पूर्वीचे कोणतेही थकीत बिल नसावे.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत अर्जदारांना मोफत वीज जोडणी दिली जाईल.
  • या योजनेचा लाभ फक्त तीच लाभार्थी घेऊ शकतील ज्यांच्याजवळ पूर्वीपासून विद्युत जोडणी नसेल.
  • शासनामार्फत या योजनेसाठी योग्य ती नियमावली तयार झाल्यानंतर विद्युत connection उपलब्ध करून दिला जाईल.
See also  असा करा पीक नुकसान भरपाई ऑनलाईन अर्ज | Pik Nuksan Bharpai Online Form 2022

आंबेडकर जीवन प्रकाश योजनेसाठीची पात्रता ( Eligibility)

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचे स्थानिक नागरिक असणे महत्वाचे आहे.
  • अर्जदार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यापैकी असणे आवश्यक.
  • अर्जदाराकडे पूर्वीचे विद्युत जोडणी असू नये.
  • पूर्वीचे कोणत्याही प्रकारची थकीत बिल शिलकी असू नये.
  • अर्जदाराकडे योग्य estimate असावे.

योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ई-मेल आणि मोबाइल क्रमांक
  • जातीचे प्रमाणपत्र
  • अधिकृत विद्युत ठेकेदारचे विद्युत जोडणीसाठीचा रिपोर्ट
  • थकबाक्की नसल्याबाबत १०० रु बॉन्डपपेरवर शपथपत्र

अर्ज कसा करावा ? How to apply for Dr Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana Online

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या विद्युत वितरण ऑफिसला जायचे आहे.
  • त्याठिकाणांहून अर्ज करण्यासाठी योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे.
  • त्या फॉर्मवरील सर्व मूलभूत माहिती भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
  • भरलेला फॉर्म तुम्हांला विद्युत विभागाच्या ऑफिसमध्ये जमा करायचा आहे.
  • पर्याय म्हणून तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता.
  • अश्याप्रकारे तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेसाठी अर्ज करू शकता.

📢 एकरकमी कर्ज परतफेड योजना अर्ज सुरु :- येथे पहा

📢 प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना असा करा अर्ज :- येथे पहा