जिल्हा परिषद योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु | Jilha Parishad Yojana Online Form | Zp Schemes

नमस्कार मित्रांनो, Jilha Parishad Yojana Online Form सुरु झालेले आहेत. आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्हा परिषदअंतर्गत 100% अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100% अनुदानावर मोटर पंप, पिठाची गिरणी, स्वयंचलित सायकल इत्यादी उपकरणे दिली जातात. Zp Schemes साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? पात्रता काय असेल ? कागदपत्रे कोणती लागतील ? संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

Jilha Parishad Yojana Online Form

जिल्हा परिषद योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. सन २०२२-२३ साठी जिल्हा परिषद योजना रबिविण्यात येत असून जालना जि.प साठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.

जिल्हा परिषद, जालना अंतर्गत दोन विभागांमध्ये विविध उपक्रमांचे वाटप केले जाते. ज्यामध्ये 5% दिव्यांगासाठी विविध उपकरण व इतर 20% जिल्हा परिषद उपकरण योजनेअंतर्गत. विविध कोणकोणती उपकरणे वाटप केली जाऊ शकतात खाली पाहू शकतात.

20% जि.प उपकरण योजना

  • मिरची कांडप यंत्र व इतर साहित्य
  • शेतकऱ्यांना तुषारसंच ( फक्त मागासवर्गीयासाठी )
  • शेतकऱ्यांसाठी 5 HP पाण्यातील विद्युतपंप ( फक्त मागासवर्गीयासाठी )
  • मागासवर्गीयांच्या झेरॉक्स मशीन
  • मागासवर्गीयांच्या छोटी पिठाची गिरणी

5% दिव्यांगासाठी जि.प योजना

  • दिव्यांगाना झेरॉक्स मशीन पुरवठा
  • दिव्यांगाना स्वयंचलित सायकलचा पुरवठा
  • दिव्यांगाना मिनी पिठाची गिरणी

जिल्हा परिषद योजना मागासवर्गीयांसाठी अटी, शर्ती व आवश्यक कागदपत्र

  • १) आधारकार्ड
  • २) बँक पासबुक
  • ३) रहिवासी प्रमाणपत्र
  • ४) लाभार्थी ग्रामीण भागातील असावा
  • ५) लाभार्थच्या नावाने ७/१२ आवश्यक
  • ६) कमीत कमी वय १८ वर्ष असावे
  • ७) सक्षम अधिकाऱ्यांनकडील जातीचे प्रमाणपत्र
  • ८) यापूर्वी कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत कोणत्याही योजनेबद्दल लाभ न घेतल्याबाबत ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र
  • ९) स्वतःच्या मालकीची ५०० चौ.फु जागा असावी.
  • १०) लाभार्थी बेघर अथवा पक्के घर नसावे (फक्त घरकुल योजनेसाठी)
See also  Maharashtra Migrant Registration: Online Application Form, Helpline Number

जिल्हा परिषद योजना दिव्यांगासाठी अटी, शर्ती व आवश्यक कागदपत्र

  • १) लाभार्थी ग्रामीण भागातील असावा व वय कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असावे.
  • २) दिव्यांग असल्याबाबतचे कमीत कमी ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले प्रमाणपत्र
  • ३) यापूर्वी कोणत्याही संबंधित योजनेतून लाभ न घेतल्याबाबत ग्रामपंचायतिचे प्रमाणपत्र
  • ४) अपंग लाभार्थी आधारकार्ड
  • ५) स्वतःच्या मालकी हक्काची ५०० चौ.फु. जागा असावी
  • ६) घर नमुना क्रमांक ८अ व ७/१२ असावा

जिल्हा परिषद योजना ऑनलाईन अर्ज सुरू

Jilha Parishad Yojana Online Form

पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जालना जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. जालना जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २०/११/२०२२ आहे याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

ऑनलाईन अर्जासाठी – येथे क्लिक करा