अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा GR आला ! १० जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी १२८६ कोटी निधी मंजूर : Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेबर व ऑक्टोबर 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानीपोटी शासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा पहिला टप्पासुद्धा यापूर्वी देण्यात आलेला होता.

बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपटीने मदत देण्याचा शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता, त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागासाठी 1286 कोटी 74 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

Ativrushti Nuksan Bharpai दुसरा टप्पा

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी 1286 कोटी 74 लाख 66 हजार रुपयांचा निधी पुणे आणि औरंगाबाद विभागासाठी मंजूर करण्यात आलेला असून, त्यानुसार विभागीय आयुक्त यांच्यामार्फत निधी वितरित (Fund Distribution) करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

यानुसार औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर तर पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती वितरित (Bank Transfer) करण्यात येणार आहे.

शासन निर्णय येथे पहा

शासन निर्णयास अनुसरून जिरायत पिकांच्या नुकसान भरपाईपोटी पूर्वी प्रति हेक्टर 6,800 रुपये आणि दोन हेक्टरची मर्यादा होती. ती आता 13600 प्रति हेक्टर करून तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढविण्यात आली आहे. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 13500 रुपयावरून 27 हजार रुपये केले आहे, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 18 हजार रुपयेवरून 36 हजार रुपये इतकी वाढ अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये शासनामार्फत करण्यात आलेली आहे.

ही मदत राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीसाठी लागू असेल. अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 नेहमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असल्यास आणि मंडळामधील गावात 33% पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले असल्यास ही मदत अनुज्ञेय असणार आहे.

See also  { महा-ऊस नोंदणी ॲप } आता ऊस नोंदणी घरबसल्या मोबाईलवरून करता येणार | Maha US Nondani App Download

लाभार्थ्यांना Ativrushti Nuksan Bharpai ची रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती थेट ऑनलाईन पद्धतीने (Online Bank Transfer) हस्तांतरित करण्यात येणार आहे. शेतकरी लाभार्थींना मदत वाटप केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावरसुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद व पुणे विभागातील फक्त शासन निर्णयामध्ये नमूद 10 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनाच ही मदत दिली जाणार आहे. कोणत्या 10 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे, हे तुम्ही खाली लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

कोणत्या १० जिल्ह्यासाठी ही नुकसान भरपाई मंजूर झाली येथे पहा

अतिवृष्टी नुकसान भरपाई १ ल्या टप्यात ३९९५ कोटी निधीसाठी मान्यता

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता, शेतीपिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासनामार्फत वाढविण्यात आलेल्या दराने मदत देण्याबाबतचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार मदतीचे वाटप करण्यासाठी 3995 कोटी 32 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा