नियमित कर्ज परतफेड अनुदानासाठी हे काम तात्काळ करा | niyamit karj mafi yojana 2022

niyamit karj mafi yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, नियमितपणे कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50,000 रू. प्रोत्साहनपर अनुदान ( Subsidy ) लवकरच म्हणजेच 15 सप्टेंबर 2022 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित ( Transfer ) केलं जाणार आहे. त्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.

नियमित कर्जपरतफेड योजनाअंतर्गत शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे व 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरपर्यंत लाभार्थी याद्यासुद्धा तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

यामध्ये कोणती शेतकरी पात्र असतील तर 2017-18, 2018-19, 2019-20 या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कमीत कमी दोन वर्ष नियमित कर्ज परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.

niyamit karj mafi yojana Maharashtra

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गतच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मदत दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर मागील प्रक्रिया पाहिली असेल, तर शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन त्यांचा बायोमेट्रिक देऊन ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जी आहे ती जमा केली जायची. त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचा म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असणे अत्यावश्यक.

बँक खात्याला आधारलिंक करण्याची प्रक्रिया ( Aadhar Seeding to Bank Account )

खालील नमूद पद्धतीने तुम्ही तुमच्या बचत खात्याला किंवा तुमच्या कर्ज खात्याला आधार क्रमांक लिंक करू शकता.

  • संबंधित बँकेमध्ये आधार लिंकिंगचा फॉर्म दाखल करून
  • बऱ्याच बँका एटीएमच्या माध्यमातून आधारलिंक सुविधा देतात
  • काही बँकामार्फत ऑनलाईनपद्धतीने बँक खात्याला आधार कार्ड जोडण्याची सुविधा आहे

वरील नमूद पद्धतीने तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडून जोडू शकता.

तर शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जमाफीच्या पात्र याद्या तयार होतील तेव्हा होतील, त्यापूर्वी तुम्ही तुमच्या बचत खात्याला किंवा कर्ज खात्याला तुमचा आधार क्रमांक लवकरात लवकर जोडून घ्या. फक्त याच नियमित कर्जपरतफेड अनुदानासाठी नाही; तर भविष्यामध्ये इतर योजना, अनुदान इत्यादीसाठी तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक ( Aadhar Link ) असणे कधीही सोयीस्कर.

See also  e-pik pahani new app version 2 | ई-पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल; नवीन ॲप ई-पीक पाहणी व्हर्जन 2 लाँच’