राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार अर्ज सुरु | National Gopal Ratna Award 2022

National Gopal Ratna Award : मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय ( Fisheries, Animal Husbandry, Dairy ) मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2022 ( National Gopan Ratna Award 2022 ) साठी शेतकऱ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय दुग्ध दिन 26 नोव्हेंबर 2022 च्या निमित्ताने हे अर्ज मागवून पात्र अर्जदारांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांची स्वतःची इच्छा असेल आणि आवड असेल असे शेतकरी राष्ट्रीय पुरस्काराच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 15 सप्टेंबर 2022 ठेवण्यात आलेली आहे.

National Gopal Ratna Award Maharashtra

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग शेतकऱ्यांना शाश्वत जीवन जगण्यासाठी खूपच मोलाचा भाग आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन आणि दूध व्यवसाय क्षेत्राच्या प्रभावी विकासासाठी शासनामार्फत सर्वोत्तरी प्रयत्न केले जात आहेत. भारतातील देशी गोवंशाच्या जाती मजबूत आहेत आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची आनुवंशिक क्षमता त्यांच्याकडे आहे. वैज्ञानिक पद्धतीने देशी गोवंश जातीचे संवर्धन व विकास करण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2014 मध्ये शासनामार्फत ‘ ” राष्ट्रीय गोकुळ मिशन “ ( RGM ) सुरू करण्यात आले.

RGM ( Rastriya Gokul Mission ) अंतर्गत दूध उत्पादन करणारे शेतकरी, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व दूध उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या दुग्ध सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2022 खालील वर्गासाठी प्रस्तुत करण्यात येत आहे.

  • देशी गायी / म्हशींच्या जातीचे संगोपन करणारा सर्वोत्तम दुग्ध उत्पादक
  • सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञान ( AIT – Artificial Intelligence Technician)
  • दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / डेरी फार्मर उत्पादक संस्था
See also  बाल संगोपन योजना काय आहे ? | Bal Sangopan Yojana Maharashtra 2022
संपूर्ण नावराष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2022
विभागपशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
सुरु वर्ष2014
लाभार्थीशेतकरी, दुग्ध उत्पादक, सहकारी संस्था इ.
अधिकृत वेबसाईटhttps://awards.gov.in/

खालील श्रेणीमध्ये Gopal Ratna Award देण्यात येईल.

  1. देशी गाय किंवा म्हशीचे पालन करणारे सर्वोत्कृष्ट डेअरी शेतकरी
  2. सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ ( Artificial Intelligence Technician )
  3. सर्वोत्कृष्ट डेअरी सहकारी संस्था
  4. दूध उत्पादक कंपनी
  5. डेअरी फार्मर उत्पादक संस्था

गोपाळ रत्न पुरस्कारासाठी पात्रता

Gopal Ratna Award Eligibility

  • गायीच्या 5 जाती व म्हशीच्या 17 जातीपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त देशी जातीचे संगोपन करणारे राज्यातील शेतकरी पुरस्कारासाठी पात्र असतील.
  • राज्य / केंद्रशासित प्रदेश पशुधन विकास मंडळ / राज्य / दूध महासंघ एनजीओ ( NGO ) किंवा इतर खाजगी संस्थेचे AI तंत्रज्ञ ( Technical ) ज्यांनी किमान 90 दिवसांसाठी AI प्रशिक्षण घेतले असतील; असे तंत्रज्ञसुद्धा या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.
  • त्याचप्रमाणे गाव पातळीवर दुग्ध व्यवसाय करणारी सहकारी संस्था किंवा दूध उत्पादक कंपनी किंवा शेतकरी उत्पादक संस्था त्याचप्रमाणे सहकारी कायदा किंवा कंपनी कायद्याअंतर्गत दर दिवसा मागे 100 लिटर इतके दूध संकलन करणारे किंवा किमान 50 शेतकरी अथवा दूध उत्पादक सभासद ज्यांच्या संस्थेची नोंदणी झालेली असेल ते सुद्धा या पुरस्कारासाठी अर्ज करू शकते.

गोपाळ रत्न पुरस्कारा अंतर्गत मिळणारी बक्षिसे

National Gopal Ratna Award मध्ये सहभाग घेतल्यानंतर प्रत्येक श्रेणीसाठी योग्यतेनुसार गुणवत्ता प्रमाणपत्र, समृतिचिन्ह ( memento ) व खालीलप्रमाणे प्रथम, द्वितीय, व तृतीय येणाऱ्यास रोख रक्कम दिली जाते. गोपाळ रत्न पुरस्कारांतर्गत दरवर्षी एकूण 09 पुरस्कार दिली जातात. 03 अवॉर्ड प्रत्येक category साठी याप्रमाणे.

  • प्रथम क्रमांक – 5,00,000 /- रु. ( पाच लाख रुपये )
  • द्वितीय क्रमांक – 3,00,000/- रु. ( तीन लाख रुपये )
  • तृतीय क्रमांक – 2,00,000 /- रु. ( दोन लाख रुपये )

गोपाळ रत्न पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदारांना  https://awards.gov.in या वेबसाईटवरती येऊन National Gopal Ratna Award 2022 या ऑपशनवर क्लिक करायचे आहे.
Gopal Ratna Award
Rashtriya Puraskar Portal 01
  • त्यानंतर एक नवीन Page उघडेल त्याठिकाणी Nominate / Apply Now या ऑपशनवर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे.
Gopal Ratna Award in marathi
Rashtriya Puraskar Portal 02

गोपाळ रत्न पुरस्कार कसा मिळविता येतो ?

गोपाळ रत्न पुरस्कार काय आहे ?

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामध्ये मोलाचे काम करण्याऱ्या तंत्रज्ञ तसेच इतर वर्गास हा पुरस्कार दिला जातो.