PM किसान सम्मान निधीचा 12वा हफ्ता येण्यासाठी हे काम करा ! PM Kisan Yojana 12th Installment Date

PM Kisan Yojana 12th Installment : देशामधील खेड्यागावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती. देशाची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशामध्ये शेतकऱ्याना आर्थिक सहाय मिळावे या अनुषंगाने शासनामार्फत विविध योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 हजार रु. याप्रमाणे मानधन दिलं जात. ही एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रु. याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यावरती पाठवली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 11वा हप्ता Transfer करण्यात आलेला आहे.

PM Kisan Yojana 12th Installment Update

आता शेतकरी वाट पाहत आहेत 12 व्या हफ्त्याची. परंतु 12वा हप्ता मिळवण्यासाठी सरकारमार्फत शेतकऱ्यांना एक अट ठेवण्यात आलेली आहे. ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे सरकारमार्फत पीएम किसान योजनेअंतर्गत 6,000 हजार रु. दिले जाणार नाहीत.

त्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एक संधी देत अंतिम मुदत वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ शेवटचे फक्त चार दिवस उरले आहेत या तारखेच्या पूर्वी शेतकऱ्यांनी जर ही केवायसी केली नाही तर अशा शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कायमचे हप्ते बंद करण्यात येतील व योजनेतून वगळून टाकण्यात येईल.

PM किसान ई-केवायसी कशी करावी ?

PM किसान सन्मान निधीयोजनेअंतर्गत शेतकरी दोन सोप्यापद्धतीने ई-केवायसी करू शकतात. ज्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे शेतकरी स्वतः घरबसल्या आपल्या आधार क्रमांकाला ( Aadhar Linked ) लिंक असलेल्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीच्या आधारे ई-केवायसी करू शकतात.

हेसुद्धा वाचा : नियमित कर्जपरतफेड योजनेअंतर्गत 50,000 प्रोत्साहनपर अनुदानासाठी तात्काळ हे काम करून घ्या.

दुसरी पद्धत म्हणजे शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक मशीनच्या साह्याने म्हणजेच हाताच्या अंगठ्याच्या ठसा लावून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते.

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जावा.
  • होमपेजवर उजव्या बाजूला तुम्हाला Farmer Corner नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी ई-केवायसी नावाची टॅब आहे त्यावर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाका व सर्च या ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका व Send OTP या बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या आधार Linked मोबाईल क्रमांकावर 6 अंकी ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी त्या ठिकाणी टाकून सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • ई-केवायसी ( eKYC ) Successful अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
  • अशाप्रकारे घरबसल्या सोप्यापद्धतीने फक्त 2 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता.
See also  EMI कमी करण्याचे 3 उपाय | 3 Best Methods to Reduce EMI

अडचण असेल तर संपर्क करा

PM किसान सम्मान निधी योजनेसंदर्भातील काही अडचण असेल तर तुम्हील खालीलप्रमाणे संबंधित पद्धतीने तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला PM किसानच्या अधिकृत तक्रार क्रमांकावर कॉल करून अथवा मेल आयडीवर मेल पाठवून समाधान मिळवता येतो.

  • पीएम किसानचा हेल्पलाईन क्रमांक 155261 किंवा 1800115526 (टोल-फ्री क्रमांक ) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क करता येतो.
  • ई-मेल आयडीवरसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. ई-मेल आयडी पुढीलप्रमाणे ( [email protected] )
  • अद्याप तुम्ही जर अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा व दरवर्षी 6,000 रु. याप्रमाणे लाभ मिळवा.