पूर्ण कर्ज परतफेड शेतकऱ्यांना 50,000 रु. लाभ | niyamit karj mafi 2022 anudan

niyamit karj mafi 2022 : शेतकऱ्यांमार्फत घेण्यात आलेली पीककर्जाची रक्कम मुदतीमध्ये व पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रु. अनुदान देण्याची प्रक्रिया सहकार विभागामार्फत सुरू झालेली आहे.

1 ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांचा आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न ( Link ) असणे बंधनकारक आहे. आधारकार्ड बँक खात्याशी जोडलेले नसल्यास शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांचा आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंक करून घ्यावा.

बँक खात्याशी आधारकार्ड जोडणी अनिवार्य, नाहीतर शेतकऱ्यांना मिळणार नाही 50,000 रु. कर्जमाफीचा लाभ.

सौजन्य : लोकमत न्युजपेपर

आधारकार्ड बँक खात्याशी जोडल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना 50,000 रू. प्रोत्साहनपर अनुदान लाभ देण्यास सुरुवात होणार आहे.

50,000 रु. कर्जमाफी अनुदानासाठी पात्र कोण ?

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 2017-18, 2018-19, व 2019-20 या तीन वर्षांमध्ये पूर्ण कर्ज परतफेड ( niyamit karj mafi 2022 ) करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रु. अनुदान देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. हा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणी करून घ्यावा. असे आवाहन प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारीमार्फत करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रु. प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2017-18 ते 2019-20 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम 50 हजार रुपये पेक्षा कमी असेल, तर अशा शेतकऱ्यांना कर्जाच्या मुद्द्याला इतका प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल.

niyamit karj mafi 2022 आधार नसेल तर ?

ज्या शेतकऱ्यांकडे बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करण्यासाठी आधारकार्ड नसेल; त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या “आपले सरकार सेवा” केंद्रावर जाऊन तात्काळ आधारकार्ड काढून घ्यावे व आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक सलग्न करावा.

See also  संजय गांधी निराधार योजना 2022 संपूर्ण माहिती | Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2022