Tractor Subsidy Scheme in Maharashtra | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022

Tractor Subsidy Scheme : आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. पण हल्ली शेती संपूर्णतः आधुनिक झाली आहे. म्हणजेच शेतीची सर्व कामे यंत्रावर होऊ लागली आहेत. याचा विचार करता शासनामार्फत “कृषी यांत्रिकीकरण” सुविधा शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात आली.

Tractor Subsidy Scheme in Maharashtra

“कृषी यांत्रिकीकरण” सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी विविध उपकरणे अनुदान तत्वावर घेता येतात. ज्यामधे ट्रॅक्टर यंत्राचासुध्दा समवेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक यंत्राचा वापर करता यावा या अनुषंगाने ट्रॅक्टर या यंत्राचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला.

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022

खुल्या किंवा जातप्रवर्गातील अर्जदार ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. 8 HP पासून 70 HP पर्यन्त ट्रॅक्टर बाजारामध्ये उपलब्ध असून त्यासाठी शेतकऱ्यांना गरजेनुसार फॉर्म भरत असताना ट्रॅक्टरचा HP द्यावा लागतो. ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर किती अनुदान रक्कम देण्यात येते ? खालील तक्त्यात तुम्हाला लक्ष्यात येईल.

जात प्रवर्गट्रॅक्टर HPअनुदान टक्केवारी
खुला प्रवर्ग8 HP ते 70 HP40% अनुदान
इतर प्रवर्ग8 HP ते 70 HP40 % अनुदान
दोन्ही प्रवर्ग8 HP ते 20 HP75 हजार रु. अनुदान
Tractor Subsidy Chart Maharashtra

सूचना : ट्रॅक्टर अनुदानसाठी काही मर्यादित रक्कमपर्यंत Capping असते. म्हणजेच 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टरसाठी 1 लाख 25 हजार रुपये मर्यादा व 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टरसाठी 75 हजार रु. इतकी जास्तीत जास्त अनुदान मर्यादा. Tractor Subsidy Scheme

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता

  • अर्जदाराच्या नवीन ७/१२, ८अ उतारा असावा
  • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा
  • अर्जदार जात प्रवर्गातून असल्यास जातीचा दाखला असावा
  • ज्या अर्जदारांनी यापूर्वी लाभ घेतला असेल, तर पुढील 5 वर्ष कोणत्याही अवजारासाठी अर्ज करता येणार नाही; पण इतर अवजारसाठी अर्ज करता येईल.
  • अर्जदाराचे आधारकार्ड असणे आवश्यक
  • शेतजमीन स्वतःच्या मालकीची असावी
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असल्यास त्यासंदर्भातील कागदपत्रे दाखल करावी लागतील
See also  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा फॉर्म भरताना लागणारी कागदपत्रे

  • अर्जदाराचा आधारकार्ड
  • बँकेचा पासबुक
  • ७/१२ उतारा
  • ८-अ उतारा
  • जातीचा दाखला ( अर्जदार जात प्रवर्गातून असल्यास )
  • पिकांची माहिती
  • पूर्वसमतीपत्र
  • स्वयंघोषणापत्र
  • सिंचन स्त्रोत माहिती

ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज कसा करावा ?

१. शेतकऱ्यांना सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने Tractor Subsidy Scheme ट्रॅक्टर यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर यावे लागेल.

२. त्यानंतर वेबसाईटवर नोंदणी करून शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर यंत्रासाठी अर्ज करावा लागतो.

३. अर्ज करण्यासाठी पुढील Steps Follow करा.

४.मुख्य घटक ➡ कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ➡ट्रॅक्टर ➡ 2 डब्लूडी ➡ एचपी श्रेणी निवडा ➡ जतन करा

५. वरीलप्रमाणे प्रक्रियाकरून अर्ज जतन करा व २३ रु. Online Payment करुन तुम्हीचा अर्ज Verify करा.

लाभार्थी निवड प्रक्रिया

  1. प्रथम शेतकऱ्यानंमार्फत Mahadbt वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना लॉटरीमध्ये नंबर लागल्याचा मेसेज येईल.
  2. शेतकऱ्यांना मेसेज आल्यानंतर पुढील प्रक्रियेमध्ये Bill, Invoice, Quotation, Test Report इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
  3. शेतकऱ्यांमार्फत देण्यात आलेले कागदपत्रे आणि माहिती बरोबर असेल तर पुढील १ ते १/२ महिन्यात बँक खात्यावर ट्रॅक्टर अनुदान रक्कम जमा केली जाते.
शेतकरी माहिती पुस्तिकायेथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप