बाल संगोपन योजना काय आहे ? | Bal Sangopan Yojana Maharashtra 2022

Bal Sangopan Yojana Maharashtra : बालकांच्या शिक्षणाला पुढाकार देण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या बालसंगोपन योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला योजने संदर्भातील संपूर्ण माहिती मिळेल, जसे बाल संगोपन योजना काय आहे ? या योजनेचे फायदे, पात्रता, लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी.

Bal Sangopan Yojana in Marathi

महिला व बाल विकास विभागामार्फत 2008 पासून बालसंगोपन योजना चालविली जाते. या योजनेअंतर्गत ज्या बालकांना आई किंवा वडील नसतील अथवा ज्या बालकांना आई-वडील यापैकी दोन्ही नसतील, तसेच बेघर व शारीरिक व्यंग असलेल्या बालकांना दरमहा 1100 रु. इतकी मदत दिली जाते. जेणेकरून या निराधार मुलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. या योजनेचा लाभ फक्त एकल बालकच नाही तर अशी सुद्धा बालके लाभ घेऊ शकतात ज्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक संकट असेल, आई-वडिलांचा मृत्यू झालेला असेल, तलाक झालेले आई-वडील असतील किंवा आई-वडील आजारामुळे दवाखान्यामध्ये ऍडमिट असते.

बाल संगोपन योजनेसाठी खालील बालक पात्र असतील

Eligibility for Bal Sangopan Yojana

  1. अनाथ किंवा ज्या बालकांच्या पालकांचा पत्ता लागत नसेल, व जी बालके दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके.
  2. एक पालक असलेली व कौटुंबिक अडचणीमध्ये असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे पालकापासून मूल विघटीत झाले असल्यास एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके कुष्ठरोग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कायद्यांची बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके इत्यादी.
  3. पालकांमधील तीव्र वैवाहिक अडचणी, अति हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीमधील बालके.
  4. शाळेत न जाणारी बाल कामगार
  5. बाल संगोपन योजनेसाठी बालकांची शिफारस राज्यातील पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, कारागृह न्यायालय कौटुंबिक हिंसाचार कायद्याखालील संरक्षण अधिकारी हे सुद्धा करू शकतील.
See also  आता मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करावे लागणार | How to Link Voting Card to Aadhar Card Online

बाल संगोपन योजनेच्या अटी

  • बाल संगोपन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बालकांनाच घेता येईल.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी बालकांचे वय 18 वर्ष व त्याखालील असणे आवश्यक.
  • शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांना गरजू मुलांची निवड करून बालकल्याण समिती पुढे हजर करणे आवश्यक राहील कारण बालकल्याण समितीच्या मान्यतेशिवाय बालकांना योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार नाही.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बालकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
योजनेचे नावबाल संगोपन योजना
विभागमहिला व बालकल्याण विभाग
लाभार्थी वर्गअनाथ, बेघर बालके
लाभार्थी राज्यमहाराष्ट्र
वयोमर्यादा०१ ते १८ वर्ष
दरमहा लाभ रक्कम११०० /- रु.
उद्देशनिराधार व अनाथ बालकांना आर्थिक मदत
अर्ज पद्धतीऑनलाईन / ऑफलाईन
शासन निर्णयhttps://bit.ly/3AJ3n6Z
अधिकृत वेबसाईटhttps://womenchild.maharashtra.gov.in/

Bal Sangopan Yojana Maharashtra 2022 पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालक महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
  • अर्जदाराचे वय 01 ते 18 वर्ष यादरम्यान असावे
  • अनाथ, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व बेघर बालक या योजनेचा लाभ घेऊ शकतील
  • योजनेनुसार सर्व कागदपत्राची पूर्वता करणे आवश्यक

Benefits Of Bal Sangopan Yojana

बाल संगोपन योजनेचे फायदे

  • योजनेअंतर्गत निराधार बालकांना 1100/- रुपये दरमहा अनुदान दिले जाईल.
  • यामुळे राज्यातील अनाथ व कमजोर बालकांना आपले शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येणार नाही.
  • योजनेअंतर्गत लाभाचे थेट हस्तांतरण लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
  • या योजनेमुळे बालकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
  • या योजनेमुळे अनाथ कमजोर बालकांना बालमजुरी करावी लागणार नाही.
  • या योजनेमुळे राज्यातील बालके सशक्त व आत्मनिर्भर बनतील. परिणामी बाल संगोपन योजनेअंतर्गत बालकांचे जीवनमान सुधारेल.

Bal Sangopan Yojana Required Documents

बाल संगोपन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधारकार्ड झेरॉक्स ( पालक व बालक दोघांचे )
  2. अर्जदारास निवासी पुरावा सादर करणे आवश्यक
  3. शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट
  4. तलाठी यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला
  5. मुलाच्या बँकचा पासबुक झेरॉक्स
  6. मृत्यूचा नोंदणी दाखला
  7. रेशन कार्ड झेरॉक्स
  8. पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
  9. मुलांचे पासपोर्ट फोटो
  10. पालकांचे पासपोर्ट फोटो
  11. ऑफलाईन अर्ज करत असल्यास अर्जाचा नमुना
  12. लाभार्थ्याच्या कुटुंबाचा तसेच त्याच्या घराचा एक कलर फोटो ( 4*6 आकारात )
See also  Mahajob Portal 2021: Online Registration at mahajobs.maharashtra.gov.in

बाल संगोपन योजना ऑफलाईन अर्ज पद्धत

Bal Sangopan Yojana Online Application Form

  • बाल संगोपन योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कार्यालयात जावावे लागेल.
  • महिला व बालविकास विभाग कार्यालयमध्ये या योजनेच्या अर्जाचा नमुना घेऊन अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून, त्या कागदपत्राची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडून सदर अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल.
  • अशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करून तुम्ही बाल संगोपन योजनेचा लाभ घेऊ शकता.

बाल संगोपन योजना ऑनलाइन अर्ज पद्धत

  • बाल संगोपन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावावे लागेल. येथे क्लिक करा
  • वेबसाईटच्या होम पेजवर आपला ऑनलाईन हा option तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करावे
  • आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सदर योजनेची संपूर्ण माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून फॉर्म Submit करावा
  • अशाप्रकारे बाल संगोपन योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.

सूचना : आमच्यामार्फत आवश्यक व योग्य ती माहिती देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी शासनाचे अधिकृत शासन निर्णय व पोर्टलवरती जाऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.

बाल संगोपन योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?

बाल संगोपन योजनेची अधिकृत वेबसाईट महिला व बालविकास विभागाची आहे. वेबसाईटची लिंक वरील नमूद लेखामध्ये देण्यात आली आहे.

बाल संगोपन योजनेअंतर्गत दरमहा किती अनुदान दिले जाते ?

दरमहा ११०० -/ रु. अनुदान निराधार बालकांना दिला जातो.