PM Kisan 12th Installment Date : पीएम किसान योजना, 12 करोड शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 2,000 रु. मिळणार

PM Kisan 12th Installment Date : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. देशभरातील जवळपास 12 करोड शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरकारकडून बँक खात्यात पैसे टाकण्यात येणार आहेत.

अधिकृत माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकार मार्फत लवकरच 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर केले जाणार आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत 12 वा हप्ता लवकरच म्हणजेच 17 व 18 ऑक्टोबर 2022 दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे.

PM Kisan 12th Installment Date

पीएम किसान सन्मान निधी योजनेमधील त्रुटी व अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी सरकारने मध्यंतरी eKYC प्रक्रिया अनिवार्य केली होती. ई-केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती; परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्याकारणामुळे eKYC साठी मुदतवाढ देण्यात आली.

हे सुध्दा वाचा : संजय गांधी निराधार योजनेबद्दल संपूर्ण माहिती !

या मुख्य कारणाने 12 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यासाठी उशीर होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नसेल त्यांनी वेबसाईटवर जाऊन आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी. PM Kisan 12th Installment Date

या शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये

पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती PM Kisan योजनेची रक्कम थेट Bank AccountIFSC CODE च्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येत असे; परंतु eKYC प्रक्रिया चालू झाल्यापासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम त्यांच्या आधार लिंक NPCI बँकेवरती ट्रान्सफर करण्यात येत आहे.

  1. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते NPCI सर्व्हरला लिंक नाही, अश्या शेतकऱ्यांना मागील 11 वा हफ्ता मिळालेला नव्हता.
  2. संबंधित शेतकऱ्यांनी जर आपले बँक खाते NPCI ला लिंक केले असेल, तर त्यांना आता मागील 11 वा हफ्ता + चालू 12 वा हफ्ता असे दोन्ही हफ्ते एकत्रित दिले जातील म्हणजेच अश्या शेतकऱ्यांना 4,000 रु. रक्कम त्यांच्या बँकेत खात्यात मिळेल.
See also  Loan Waiver : कोरोनातील मयताना मिळणार कर्जमाफी | राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

पात्र यादीत नाव कसे पहावे ?

  1. सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. https://pmkisan.gov.in/
  2. त्यानंतर होम पेजवरील उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर यामधील Beneficiary List या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  3. त्यानंतर पुढे ड्रॉप डाऊन मेनू मधून आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव अश्याप्रकारे अनुक्रमे माहिती निवडा.
  4. त्यानंतर Get Report या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या गावातील संपूर्ण पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दाखवली जाईल.
  5. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, तर समजा की तुम्हाला 12 वा हफ्ता नक्की मिळणार.