हरभरा तणनाशक – पेरणी केल्यानंतर 48 तासात या तणनाशकाची फवारणी करा : Harbhara Tannashak

शेतकरी मित्रांनो, सध्या रब्बी हंगाम चालू आहे आणि हरभरा या डाळवर्गीय पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हरभरा पिकासाठी हरभरा तणनाशक उपलब्ध नसल्याकारणाने मजुरांना रोजगार देऊन कोळपणी, खुरपणी करून पिकातील गवत, तण काढून टाकावे लागते. मजूर वेळेवर मिळत नाहीत, तसेच खर्चसुध्दा जास्तीचा येतो.

हरभरा पेरणी केल्यानंतर 48 तासात आपण तणनाशक (herbicide for gram) फवारणी करून योग्यरीत्या तणाचे नियंत्रण करू शकतो. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. हरभऱ्यासाठी योग्य तणनाशक कोणते? तणनाशकाचा प्रमाण काय असेल ? फवारणी कशी करावी ? याबदलची संपूर्ण माहिती.

हरभरा तणनाशक (Herbicide For Gram)

हरभरा पिकाची पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत Pendimethalin 38.7 CS हा घटक असलेले कोणत्याही कंपनीचे तणनाशक वापरता येते. पीक पेरणीनंतर किंवा सिंचनापूर्वी हे तणनाशक जमिनीवर अच्छादन स्वरूपात वापरतात.

या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर पुढील 30-45 दिवस शेतामध्ये गवत उगवत नाही. Pendimethalin 38.7 CS बीजनाशक असून नव्याने गवत उगवू देत नाही. हा घटक असलेली बहुतांश तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये TATA, Agrostar, UPL, IFFCO चा समावेश आहे.

हे सुध्दा वाचा : हरभरा लागवड तंत्रज्ञान, वाण, पेरणीपूर्व तयारी इत्यादी संपूर्ण माहिती

हरभरा तणनाशक प्रमाण आणि वापर

तणनाशक फवारणी करत असताना जमीन ओली असल्याची खात्री करून घ्यावी. कोरड्या जमिनीतसुद्धा फवारणी करता येईल पण फवारणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे लागेल.

आता तणनाशक औषधाचा प्रमाण किती ? तर एकरी 700ml प्रमाणे मिश्रण करून फवारणी करावी. Pendimethalin 38.7 CS घटक असलेले तणनाशक साधारणतः 700ml ची बॉटल 550-750 रुपयांपर्यंत बाजारात मिळेल.

हरभरा तणनाश करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी

  • तणनाशक फवारण्यापूर्वी एक पाळी द्यावी, म्हणजे तणनाशक मातीत संपूर्णतः मिसळण्यास मदत होईल.
  • हरभरा पेरणी झाल्यापासून 21 दिवसांनी कोळपणी व एक खुरपणी करावी.
  • आवश्यकता भासल्यास पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी एकवेळस खुरपणी करावी.
  • तणनाशक अनेक प्रकारची असतात. काही उगवण्यापूर्वी मारायची असतात, तर काही उगवल्यानंतर त्यामुळे तणनाशक फवारणी करताना काळजी घ्या.
  • काही तणनाशक पिकांना अपाय न करता केवळ तणाचा नाश करतात. काही पिकांना पण अपाय करतात त्यामुळे तणनाशक निवड करताना काळजी घ्या.
See also  Crop Loss Compensation : ऑक्टोबरमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय

सूचना : वरील शिफारस स्वाजबाबदारीने वापरावी.


📢 हळद लागवड अनुदान योजना : येथे पहा

📢 शेतमाल तारण कर्ज योजना : येथे पहा