ABHA Health Card : ‘आभा’ आरोग्य कार्ड काढा व मोबाईलवर मेडिकल हिस्ट्री मिळवा !

शासनामार्फत आता रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी म्हणून ABHA Health Card सुरू करण्यात आलं आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल किंवा Health Card सोबत बाळगाव लागत. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात.

वरील सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना Health Card दिलं जाणार आहे. ABHA Health Card म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी लाँच करण्यात आला असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे.

ABHA Health Card

सर्व माहिती डिजिटल (Digital) स्वरूपात ABHA Health Card वर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ यांना रुग्णांची पूर्व पार्श्भूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार इत्यादी माहिती समजण्यास जलद आणि सोयीस्कर मदत होणार आहे.

आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.

कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

आभा हेल्थ कार्ड कसा काढावा ?

आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://healthid.ndhm.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर आल्यानंतर Create ABHA या पर्यायावर क्लिक करून आपला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी आयडी कार्डचा नंबर टाकून नोंदणी करून घ्या.

आधारकार्डने ABHA Health Card बनवत आल्यास तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे. आधार क्रमांक मोबाईलवर आलेली OTP टाकून तुम्हाला प्रोफाइल पूर्ण करावी लागेल.

ABHA Health Card साठी आवश्यक कागदपत्र ?

  • आधारकार्ड (Aadhaar Card)
  • मोबाईल क्रमांक
  • जन्म नोंदणी दाखला
  • रहिवासी पत्ता
  • आधारकार्ड नसेल, तर इतर ओळखपत्र
See also  collateral free loans : दहा कोटीपर्यंत कर्ज आता विनातारण : केंद्र शासनाची कर्ज हमी योजना

हेल्थ कार्डचे फायदे काय असतील ?

  • इलाज करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही.
  • आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल.
  • ऑनलाईन उपचार, टेलीमेडिसिन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील.
  • तुमचा मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरीत्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल.
कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

📢 हे कार्ड काढा २ लाखापर्यंत लाभ मिळवा : येथे पहा

📢 799 रुपयांत मिळवा 20 लाखाचा विमा : येथे पहा