Chana Cultivation : हरभरा लागवड तंत्रज्ञान, वाण, पेरणीपूर्व तयारी, खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती

हरभरा लागवड : हरभरा हे डाळवर्गीय पिक सामान्यता: रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं. हरभरा पिकास थंड व कोरडे हवामान पोषक असते. रब्बी हंगामामध्ये जितकी थंडी असेल तितकीच रब्बीची पिके पोषक ठरून उत्पन्नामध्ये वाढ देतात.

आज आपण हरभरा लागवड कशी करावी ? हरभरा लागवड तंत्रज्ञान, हरभऱ्याच्या विविध जाती किंवा वाण, एकरी लागणारे प्रमाण इत्यादी बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

हरभरा लागवड पेरणीपूर्व तयारी

हरभरा ओलाव्यामध्ये येणारे पीक आहे, त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा असताना पेरणी करण्याचा प्रयत्न करा. सोबतच जमिनीची जास्त मशागत करू नका; ज्या कारणाने जमिनीमधील ओलावा कमी होईल.

पेरणीपूर्व बियाणाला पूर्वकाळजी म्हणून बुरशीनाशक पावडरचा वापर करावा तसेच रायझोबियम (Rhyzobium) व पीएसबी (PSB) ही जैविक खते (Organic Fertilizer) प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति एक किलो हरभरा बियाणा लावावे.

पिकाचे नावहरभरा ( चना )
पेरणी हंगामरब्बी ( हिवाळी )
जाती किंवा वाणाचे प्रकारPDKV कांचन, विजय, विकास, फुले विक्रम, दिग्विजय, जाकी ९२१८ इत्यादी
हेक्टरी लागणारे प्रमाणजात किंवा वाणानुसार
योग्य पेरणीपूर्व खत10:26:26 12:32:16

हरभरा लागवड खत व्यवस्थापन

हरभरा द्विदल पीक असून; द्विदल पिकांच्या मुळावर गाठी असतात. हे पीक हवेतील नायट्रोजनचा वापर करून नत्राची (N) गरज भागवत असतात. या कारणाने हरभरा पिकाला नत्राची खूपच कमी गरज भासते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या पिकासाठी कमी नत्र असलेले खत वापरावे लागेल, जसे 10:26:26 किंवा 12:32:16

हरभरा पिकाची पेरणी करताना एकरी एक बॅग 10:26:26 किंवा 12:32:16 द्यावे, सोबतच यामध्ये एकरी 10 किलो सल्फर मिसळावा. हरभरा पिकाची पेरणी करताना कधीही युरिया खताचा वापर करु नये. रब्बी पिकाला पेरणीपूर्व खत वापरावे उगवण झाल्यानंतर खत वापरण्याची आवश्यकता नाही.

See also  प्लास्टिकचे स्मार्ट आधार कार्ड अवैध ! 50 रु. मध्ये मागवा मूळ Smart Card | Order Aadhar Smart Card Online at 50 Rs.

एकरी किती बियाणे लागणार ?

  • तुम्ही पेरणी करत असलेले हरभरा बियाणे किंवा वाण आकारमानाने बारीक असेल, तर उदाहरणार्थ PDKV Kanchan, Vijay, Vikas इत्यादी प्रति हेक्टरी 50 ते 60 किलो बियाणे लागेल.
  • मध्यम आकाराच्या वाणाचे हरभरा बियाणे, उदाहरणार्थ PDKV Kanak, Jaki 9218, Digvijay, Akash या जातीचे 75 ते 85 किलो बियाणे प्रति हेक्टर लागेल.
  • मोठ्या आकाराचे वाण ज्यामध्ये काबुली हरभरा मोडतो, त्यासाठी प्रति हेक्टरी 100 ते 110 किलो बियाणे लागेल.

पेरणी कधी करावी ?

कोरडवाहू हरभऱ्याचे वाण पेरत असाल, तर ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्या पेरणी पूर्ण करावी. ओलिताखालील हरभऱ्याची पेरणी 10 नोव्हेंबरपर्यंत करावी. या कालावधीमध्ये पेरणी करणे शक्य नसल्यास अथवा पेरणी 30 नोव्हेंबरपर्यंत जात असल्यास पेरणीकरिता राज, विजय 202 या वाणाची निवड करावी.

हरभरा लागवडीसाठी इतर महत्त्वाच्या टिप्स

  • कोरडवाहू देशी हरभऱ्याच्या उत्पादनासाठी पेरणीपूर्व हरभरा 4 तास पाण्यामध्ये भिजून पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
  • पिकाच्या चांगल्या व भरघोस उत्पन्नासाठी पीक सुमारे 45 दिवस तणमुक्त ठेवावे.
  • पेरणी करताना बियाणे पुरेश्या ओलीवर व खालीपर्यंत पडेल याची दक्षता घ्यावी.
  • पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 80 से.मी व दोन झाडातील अंतर 100 से.मी ठेवावे.

हरभरा पिकाचे विविध कोणते वाण आहेत ?

देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम इत्यादी तर काबुली हरभऱ्यामध्ये विराट PKV-2, PKV-4 आणि कृपा इत्यादी वाण आहेत. याव्यतिरिक्त सुद्धा भरपूर वाण हरभरा पिकामध्ये मोडतात.

हरभरा पेरणीसाठी हेक्टरी किती बियाणे लागते ?

हरभरा बियाण्यांच्या वाणानुसार हेक्टरी बियाणे लागते; परंतु सामान्यता 60 किलो ते 80 किलोच्या दरम्यान हेक्टरी बियाणे आवश्यक असते.

हरभरा पिकाची पेरणी कोणत्या महिन्यामध्ये होते ?

हरभरा पिकाची पेरणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान केली जाते.