cycle vatap anudan yojana | आता मुलींसाठी मोफत सायकल वाटप अनुदान योजना सुरु

cycle vatap anudan yojana : महाराष्ट्र शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजनांची, शैक्षणिक सवलतींची, फीस माफीची सुरुवात केली जाते. आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुलींना देण्यात येणाऱ्या मोफत सायकल वाटप योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Cycle Vatap Anudan Yojana Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी दुर्गम भागातील म्हणजेच खेड्यापाड्यातील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरापासून काही शाळा दूर अंतरावर असतात. त्यामध्ये रस्त्यांची दुर्दशा, उन्हाळ्यामधील उन्हाचा त्रास अशा सर्व बिकट परिस्थितीमधून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. बहुतांश विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यामुळे शाळेला जाण्या-येण्यासाठी सायकल किंवा अन्य वाहनासाठी त्यांच्याकडे पुरेशी पैसे नसतात.

हे सुध्दा वाचा : स्वाधार योजना काय आहे ? या योजेअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्याना 50,000 रु. मदत दिली जाते ?

वरील सर्व अडचणीचा विचार करता विद्यार्थ्यांना शाळेला जाण्या येण्यासाठी सोयीस्कर व्हावे; म्हणून शासनामार्फत मोफत सायकल वाटप अनुदान दिलं जातं. यासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, योजनेची मुख्य उद्दिष्टे, वैशिष्ट्ये अर्ज कसा करावा. याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात.

योजनेचे नावसायकल वाटप अनुदान योजना
विभागनियोजन विभाग
शासन निर्णय दिनांक16 फेब्रुवारी 2022
लाभार्थी राज्यमहाराष्ट्र
लाभार्थी वर्गगरीब व दुर्गम भागातील विद्यार्थिनी
लाभ रक्कम5,000 रु. आर्थिक अनुदान
अर्ज पद्धतऑफलाईन
overview of cycle subsidy scheme in Maharashtra

सायकलसाठी अनुदान वाटप करण्याचा शासनाचा मुख्य हेतू

Purpose of Distributing Cycle Subsidy

  • सायकल वाटपासाठी अनुदान देण्याचा शासनाचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांची घर ते शाळा शाळा ते घर यादरम्यान पायाने चालत जाऊन होणारी हैरानी, त्याचप्रमाणे वेळेचा अपव्य इत्यादी टाळण्यासाठी.
  • राज्यातील मुलींना शाळेत जाण्या-येण्यासाठी सायकल वाटपास अनुदान देऊन त्यांना सशक्त्व आत्मनिर्भर बनविणे.
  • परिणामी मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
See also  Beej Bhandwal Yojana Maharashtra | बीज भांडवल कर्ज योजना अर्ज सुरु

सायकल वाटप अनुदान योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

Key Features Of Cycle Vatap Subsidy Scheme

  • घरापासून शाळेचे अंतर दूर असलेल्या विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अनुदान देण्यासंदर्भात चालू करण्यात आलेली शासनामार्फतची ही महत्त्वपूर्ण योजना आहे.
  • कौटुंबिक परिस्थिती बिकट असलेल्या इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते.
  • सायकल घेण्यासाठी इतरांवर निर्भर न राहता शासनामार्फत सायकल खरेदीसाठी अनुदान देण्यात येत.
  • सायकल घेण्यासाठी अनुदान डीबीटी ( DBT – Direct Benefit Transfer ) प्रणालीच्या माध्यमातून मुलींच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे विद्यार्थिनींना अनुदानासाठी बँकेत किंवा इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही.

सायकल वाटप योजनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणारी फायदे

Benefits of Maharashtra Cycle Vatap Anudan Yojana

  • विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्यामुळे घरापासून शाळेला व शाळेपासून घराला येण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.
  • परिणामी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मुबलक वेळ प्राप्त होईल.
  • सायकल वाटपामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण होऊन ते अभ्यासासाठी नक्कीच उत्स्फूर्त होतील.
  • सायकलमुळे मुलींना पायी चालत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • सायकल खरेदीसाठी शासनाकडून 5,000 रु. इतकी रक्कम दिली जाईल. या रकमेमध्ये सहजरीत्या विद्यार्थी सायकल खरेदी करू शकतील.

सायकल वाटप योजनासाठी आवश्यक पात्रता

  • सायकल वाटप अनुदान मिळवण्यासाठी विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 8 वी ते 12 वी इयत्तेमध्ये शिकत असणे आवश्यक आहे.

सायकल वाटप योजना अटी व शर्ती

cycle vatap yojana terms & conditions

  • फक्त इयत्ता आठवी ते बारावी वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • सायकल अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींची शाळा घरापासून 5 किंवा त्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर असावी.
  • सायकल खरेदीसाठी 5 हजार रुपये इतकी रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाईल. या व्यतिरिक्त रक्कम लागत असेल, तर विद्यार्थ्यांना वरील रक्कम स्वतःहून खर्च करावी लागेल.
  • महाराष्ट्र व्यतिरिक इतर राज्यातील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • 8 वी ते 12 वी या चार वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये फक्त एकच वेळेस सायकल योजनेच्या अनुदानाचा लाभ घेता येईल.
  • सायकल वाटप योजनेचा लाभ फक्त मुलींना देण्यात येई. मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • खेड्यापाड्यातील, दुर्गम भागातील व ज्या ठिकाणी कच्च्या प्रकारचे रस्ते असतील अशा भागातील विद्यार्थिनींना योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
See also  EMI कमी करण्याचे 3 उपाय | 3 Best Methods to Reduce EMI

सायकल वाटप अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. विद्यार्थिनींचा आधारकार्ड
  2. राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक
  3. रहिवास प्रमाणपत्र
  4. पासपोर्ट आकाराचे फोटो
  5. राशनकार्ड
  6. मोबाईल क्रमांक
  7. ई-मेल आयडी
  8. सायकल खरेदी पावती
  9. विद्यार्थिनी विद्यार्थिनी 8वी ते 12वी इयत्तेमध्ये शिकत असल्याबाबतचा प्रमाणपत्र.

सायकल वाटप योजनासाठी समाविष्ट शाळा

  • जिल्हा परिषद शाळा
  • खाजगी शाळा
  • विनाअनुदानित शाळा
  • अनुदानित शासकीय आश्रम शाळा

सायकल वाटप योजनेमध्ये किती अनुदान देण्यात येईल ?

सायकल खरेदीसाठी मुलींना अनुदानाची रक्कम दोन टप्प्यांमध्ये बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येईल.

  • पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थिनीच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात 1,500 रु. इतकी रक्कम डीबीटी ( DBT- Direct Benefit Transfer ) प्रणालीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येईल.
  • दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित रक्कम विद्यार्थिनींना सायकल खरेदी केल्यानंतर व संबंधित सायकलचे पावती तसेच इतर कागदपत्र सादर केल्यानंतर 1,500 रु. देण्यात थेट येतील.

सायकल वाटप योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा ?

गरजू विद्यार्थिनी खालीलपैकी दोन पद्धतीचा अवलंब करून सायकल वाटप अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकतात.

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू विद्यार्थी सध्या स्थितीमध्ये शिकत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याकडून या योजनेचा फॉर्म घेऊन, फॉर्ममधील माहिती सविस्तररित्या भरून संबंधित फॉर्म शाळेमध्ये दाखल करू शकतात.
  2. गरजू अर्जदार विद्यार्थिनी त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामधील संबंधित विभागामध्ये चौकशी करून, या योजनेचा फॉर्म घेऊन, तो फॉर्म भरून सर्व कागदपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित विभागाकडे दाखल करू शकतात.
शासन निर्णय PDFयेथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईनजॉईन करा

सायकल वाटप योजनेअंतर्गत किती अनुदान देण्यात येते ?

8 वी ते 12 वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी 5,000 रु. इतकी अनुदान रक्कम अदा करण्यात येते.

सायकल वाटप योजनेचा लाभ कोणत्या राज्यातील विद्यार्थ्याना भेटेल ?

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटेल.