Jamin Mojani Machine : शेतजमिनीची मोजणी अचूक व वेळी होणार | 1,000 रोव्हर मशीनसाठी सरकारकडून निविदा

Jamin Mojani : अचूक व कमी वेळात शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी वापरण्यात येणार महत्वपूर्ण यंत्र म्हणजे रोव्हर मशीन ( Rover Machine ) होय. यासंदर्भात शासनामार्फत वेळोवेळी बदल केले जातात. मागील काही दिवसामागे रोव्हर मशीन घेण्यासाठी भूमि अभिलेख विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या.

परंतु या निविदाचे दर खूपच जास्त असल्याकारणाने मागील निविदास शासनामार्फत फेटाळून नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोव्हर मशीनद्वारे जमिनीची मोजणी करण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

Jamin Mojani Machine

राज्यभरातील कोणतेही जमिनीचे तासाभरात मोजणी करण्यासाठी राज्यशासनाकडून 1,000 रोव्हर यंत्रे खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी 80 कोटीचा निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख विभागामार्फत सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने 77 स्थानके ( CORS – Continuous Operation Reference Station ) उभारली आहेत.

या 77 स्थानकापैकी प्रत्येकी स्थानकांवर एक रोव्हर यंत्र उभारण्यात येणार असून भूमी अभिलेख विभागाने 77 स्थानकांसाठी निविदा मागविल्या आहेत. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाकडे एकूण 88 निविदा आल्या होत्या; परंतु त्यामधील बहुतांश निविदा आधीच्या दराची मागणी करत असल्यामुळे प्राप्त निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

Jamin Mojani Maharashtra

याविषयी माहिती सांगताना “भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले” की, रोव्हर यंत्रे खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदाबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. सर्व निविदा वाढीव दराने आल्याचे सांगताच महसूल मंत्री यांनी नवीन निविदा काढण्यासाठी सूचना व सोबतच मंजुरी दिली.

हे सुद्धा वाचा : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! यांना भेटणार दिवाळी बोनस संच फक्त १०० रुपयांमध्ये

त्यानुसार 77 स्थानकावरील रोव्हर यंत्रासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार असून, यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे; परंतु ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाईल अशी माहिती आनंद रायते यांच्यामार्फत देण्यात आली.

See also  Agriculture Loan : भूविकास बँकेची सरसकट कर्जमाफी जाहीर नवीन GR आला ! | Bhuvikas Bank Karjmafi Yojana

जमीन मोजणीसाठी रोव्हर यंत्रच का ?

सद्यस्थितीमध्ये जर तुम्हाला माहिती असेल, तर Jamin Mojani साठी भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस ( ETS – Electronic Total Station ) या यंत्राचा वापर केला जातो. जागेवर जीपीएस ( GPS ) रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते. या प्रक्रियेला जवळपास तीन ते चार तासाचा कालावधी लागतो. जीपीएस रिडिंग घेण्यासाठीचा लागणारा वेळ कमी करण्यासाठी शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने CORS या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

नव्याने विकसित करण्यात आलेली रोव्हर मशीन उपग्रहाच्या आधारे प्राप्त तरंगलहरीद्वारे अचूक ठिकाण दर्शविते. संबंधित ठिकाणच्या अक्षांश रेखांशवरून Autocad सारखे सॉफ्टवेअर वापरून अवघ्या तासाभरात दहा एकर जमिनीची मोजणी अचूक व सुलभरीत्या करता येते.