Panasonic रत्ती छात्र शिष्यवृत्ती 2022-23 : Panasonic Ratti Chhatr Scholarship 2022-23

बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. उच्च व नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये Admission घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना Scholarship पासून वंचित रहावे लागते. आजच्या लेखामध्ये आपण कोणत्याही आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 42 हजार रुपये Scholarship मिळते या शिष्यवृत्तीबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

Panasonic रत्ती छत्र शिष्यवृत्ती 2022-23 हा Panasonic मार्फतचा शैक्षणिक उपक्रम आहे. ज्या उपक्रमाच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. यामुळे अश्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत मिळते.

Panasonic Ratti Chhatr Scholarship 2022-23

Panasonic Ratti Chhatr Scholarship अंतर्गत विद्यार्थ्यांना B.E/B.Tech मध्ये प्रवेश मिळतो. कोणत्याही आयआयटी (Indian Institute of Technology) मधील अभ्यासक्रमांना त्यांचे शिक्षण शुल्क भरण्यासाठी चार वर्षासाठी 42,500 रुपये इतकी रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून प्रदान करण्यात येते.

सूचना : विद्यार्थ्यांना या Scholarship चा लाभ घेण्यासाठी Admission Letter आणि 1st Semester Fee Receipt ही दोन्ही कागदपत्रे आवश्यक असतील.

पात्रता ( Eligibility )

  • कोणत्याही आयआयटीमध्ये BE/B.Tech चालू वर्ष 2022 मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पात्र असतील.
  • विद्यार्थी 12 वी (Hsc) परीक्षा उत्तीर्ण असावेत किंवा परीक्षेच्या अंतिम निकालाची वाट पाहत असावेत.
  • 12 वी मध्ये 75% पेक्षा जास्त मिळालेले असावेत.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून मिळून 8,00,000 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • भारतातील कोणतेही विद्यार्थी या Scholarship साठी अर्ज करू शकतात.
  • फक्त 2022-23 या बॅचमधील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असतील.

कागदपत्रं आणि ऑनलाईन अर्जासाठी

येथे क्लिक करा


📢 या बँकेतील शेतकऱ्यांचीसुध्दा कर्जमाफी :- येथे पहा

📢 विद्याधन स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत २०,००० आर्थिक मदत : येथे पहा

See also  अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा GR आला ! १० जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी १२८६ कोटी निधी मंजूर : Ativrushti Nuksan Bharpai