Mini Tractor Subsidy Scheme : मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना 2022-23

Mini Tractor Subsidy : शेतकरी मित्रांनो, अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये मशागत, पेरणी, फवारणी इत्यादी कामासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता नक्की भासते. अश्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) उपलब्ध झाला, तर खूपच आनंदाची गोष्ट आहे.

नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र गटांनी दि. 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन नांदेड समाज कल्याणचे आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 – Mini Tractor Subsidy Scheme

समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटांना 90% अनुदानावर Mini Tractor व त्याची उपसाधने उदाहरणार्थ, कल्टीवेटर, पुरवठा वेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

हे सुध्दा वाचा : 70 HP पर्येंतच्या ट्रॅक्टरसाठी अनुदान 1.25 लाख रु. अनुदान मिळवा ! असा करा ऑनलाईन अर्ज

योजनेच्या लाभाचे स्वरूप : बचत गटांना Mini Tractor व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु. 3.15 लाखाची आर्थिक मदत.

मिनी ट्रॅक्टर अनुदान अटी व शर्ती :

  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • स्वयंसहायता बचत गटातील कमीत कमी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत, त्याचप्रमाणे स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.
  • ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांच्या खरेदीवर 3.15 लाख रु. इतकी शासकीय अनुदानित रक्कम अनुज्ञेय राहील.
  • ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

Mini Tractor Subsidy साठी संपर्क कुठे करावा ?

संबंधी जिल्ह्याच्या, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण

अर्ज प्रक्रिया व लाभाचे टप्पे

  1. ऑनलाईन अर्ज सादर करणे : बचत गटाची व बचत गटातील सदस्यांची संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरून अर्ज ऑनलाईन सादर करणे.
  2. Summary प्रिंटआउट सादर करणे : ऑनलाइन पद्धतीने सादर केलेला अर्ज वैध झाल्यास या अर्जाची सारांश प्रिंटआऊट सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाईन सादर करावी.
  3. लाभार्थी निवड : वैध झालेल्या सर्व अर्जामधून चिट्टीपद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
  4. Invoice Bill सादर करणे : खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्टर व इतर साहित्याची पावती ऑनलाईन सादर करणे. सादर केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक, पावती क्रमांक, खरेदी दिनांक, Vehicle Chassis Number, उपसाधनांचा अनुक्रमांक इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. मूळ खरेदीची पावती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयामध्ये जमा करणे अनिवार्य असेल.
  5. वाहन परवाना सादर करणे : लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनाचा आरटीओ मार्फत मिळणारा परवाना ऑनलाइन सादर करणे त्याचप्रमाणे वाहन परवाना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कार्यालयामध्ये जमा करणे अनिवार्य असेल.

महत्वाची सुचना : संबंधित योजना किंवा उपक्रम नांदेड जिल्हा समाजकल्याणमार्फत राबिविला जात आहे; त्यामुळे लाभार्थी किंवा वाचकांनी ही योजना त्यांच्या जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयामध्ये आहे का याबद्दल चौकशी करून घ्यावी.

See also  Crop Loss Compensation : अतिवृष्टीची नोंद नसली, तरी मिळणार आर्थिक मदत | ativrushti nuksan bharpai madat maharashtra