आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीजपुरवठा भारनियमन बंद, फक्त या जिल्ह्यांचा समावेश

शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी रात्र-अहोरात्र जागी राहून पाणी द्यावे लागते. लोडशेडिंगच्या कारणामुळे शेतकऱ्यांचे अश्याप्रकारचे हाल होतात. कधीकधी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांसोबत सुद्धा सामना करावा लागतो.

हे सुध्दा वाचा : शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंपासाठी आता ९० टक्के अनुदान मिळणार

महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांमार्फत दिवसाचा वीजपुरवठा शेतकऱ्यांना देण्यात यावा, लोडशेडिंगचे प्रमाण कमी करावे, यासंदर्भात बऱ्याचवेळी मोर्चे व आंदोलने करण्यात आलेली आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांना आता दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

लोडशेडिंगच्या कारणामुळे शेतकऱ्यांना दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते, रात्रपाळीत पाणी देत असताना, वन्यप्राण्यांच्या हल्यांमध्ये बरेच शेतकरी दगावल्याच्या बातम्यासुद्धा आपल्यासमोर आलेल्या आहेत.

खालील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिवसा वीजपुरवठा

वनक्षेत्रात रात्री शेतीला पाणी देताना वन्य प्राण्याचे होणारे हल्ले लक्ष्यात घेता, शासनामार्फत आता चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

याबाबतची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. या मागणीस ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मान्यता देण्यात आल्याची माहिती वन मंत्री यांनी दिली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे शेतीसाठी करण्यात येणारे भारनियमन रद्द करून सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये कृषीपंपांना सलग वीजपुरवठा देण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांच्यामार्फत देण्यात आली आहे. याबद्दलचे तातडीचे सकारात्मक आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत ऊर्जा विभागाला देण्यात आलेले आहेत.

निर्णयामधील महत्त्वाचे पॉईंट्स

  • वन्य प्राण्यांपासून संरक्षण होणार
  • सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळात कृषी पंपांना आता सलग वीजपुरवठा
  • वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे बळी
  • रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी धास्तावले होते

सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठयाची आवश्यकता

फक्त वरील जिल्ह्यासाठीच नाही, तर महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यामध्ये वीज भारनियमनाच्या समस्येला शेतकरी सामोरे जात आहेत. रात्रपाळीचे पिकांना पाणी देणे कधीकधी शेतकऱ्यांच्या जीवावर येऊन बेतत आहे. शासनामार्फत उर्वरित जिल्ह्यांनासुद्धा दिवसा वीजपुरवठा पुरवण्याची सक्त आवश्यकता आहे.

See also  शालेय प्रवासासाठी वर्षाला 6,000 रु. मिळणार : Student Transport allowance Scheme

बरेच शेतकरी विजेच्या भारनियमनामधून बाहेर येण्यासाठी कुसुम सोलरपंप योजनेचा आधार घेत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कुसुम सोलर पंप योजना हा सुद्धा शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचनासाठीचा एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे.