गावठाण जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी सुरु, प्रत्येकाला मिळणार पीआर कार्ड : Swamitva Yojana in Marathi

Swamitva Yojana : मित्रांनो, तुम्हांला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत २४ एप्रिल २०२१ रोजी घोषित करण्यात आलेली Swamitva Yojana माहिती आहे का ? ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतजमिनीची डिजिटल (Digital) पद्धतीने म्हणजेच ड्रोनच्या (Drone) साह्याने मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार होतं.

आता या Swamitva Yojana प्रक्रियेला सुरुवात झाली असून, गावठाण जमिनीचे GIS आधारित सर्वक्षण मॅपिंग करून ग्रामीण भागातील नागरिकांना मालमत्तापत्रक म्हणजेच पीआर कार्ड (Property Card) देण्यासाठी गावठाण जमिनीची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात येत आहे. त्यानुसार आता प्रत्येकांना पीआर कार्ड मिळणार आहे.

स्वामित्व योजना काय आहे ?

गावठाणातील प्रत्येक मालमतेची ड्रोन या अत्याधुनिक यंत्राने मोजणी करून अद्ययावत नकाशे तयार करणे. मालमतेची सनद तयार करणे त्याचप्रमाणे मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड तयार करणे यासाठी स्वामित्व योजना (Swamitva Yojana) शासनामार्फत राबविण्यात आली.

योजना नावस्वामित्व योजना
विभागपंचायत राज मंत्रालय
सुरुवात दिनांक२४ एप्रिल २०२१
लाभ / फायदेनागरिकांना जमीनीच पुरावा, डिजिटल आराखडा इत्यादी
वेबसाईटयेथे पहा

Swamitva Yojana Started in Maharashtra

बहुतांश जिल्ह्यांतील भूमापन विभागामार्फत गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात आले. ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख (Land Revenue) व भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या साहाय्याने गावठाण भूमापन व इतर जमीन मोजमापणीचे काम ड्रोनच्या साहाय्याने चालू आहे. सर्वेक्षण (Survey) पूर्ण झाल्यानंतर संगणीकृत नकाशे (Computerized Maps), मिळकत पत्रिका मिळणार आहेत.

हे सुध्दा वाचा : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना काय आहे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती !

स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले जाणार असून, यामुळे गावातील शासनाच्या मालकीच्या मिळकतीचे संरक्षण, मिळकतीचा नकाशा व सीमा निश्चिती, मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे ? याची योग्य पद्धतीने नोंद होणार आहे.

See also  फक्त 436 रुपयात मिळवा दोन लाख रुपयाचा विमा; केंद्र सरकारची भन्नाट विमा पॉलिसी

शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेमुळे गावकऱ्यांच्या नागरी हक्काचे संवर्धन होऊन गावातील रस्ते, सरकारी हद्दीतील रिकामी जागा, नाल्या, अतिक्रमित स्थाने, बांधकाम परवाना इत्यादी सर्व बाबतीत ड्रोन सर्वेक्षण नक्कीच उपयोगी असणार आहे.

प्रत्येक गावकऱ्यानां मिळणार नकाशा व पीआर कार्ड

देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक जनसामान्य नागरिकांकडे आजही आपल्या घराबद्दलचे, शेत जमीनीबद्दलचे कोणतेही कागदपत्र अथवा पुरावे नाहीत. त्यामुळे सरकारकडून ग्रामीण भागातील शेती, जमीन, घरे इत्यादी बद्दलचा ड्रोन या यंत्राद्वारे सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षण केल्यानंतर ज्या-त्या नागरिकांना मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येईल. ज्याला प्रॉपर्टी कार्ड (Property Card), ई-संपत्ती कार्ड किंवा भूमी प्रमाणपत्र (Land Record Certificate) म्हणून संबोधण्यात येईल.

10 ते 15 मिनिटात जमिनीची मोजणी

ड्रोनद्वारे मोजणी केल्यास संपूर्ण गावाची मोजणी सामान्यतः 10 ते 15 मिनिटात पूर्ण होईल. ज्यामध्ये गावातील गावठाणाची हद्द, मालमत्तांचे क्षेत्र, मालकी रस्ते इत्यादी प्रकारची माहिती उपलब्ध होते.