अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत सरसकट मिळणार ई पीक पाहणीची अट शिथिल

आता ई-पीक पाहणीची अट शिथिल करण्यात आली असून, सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत सरसकट मिळणार आहे. शासनामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या की, ई-पीक पाहणी करा अन्यथा अतिवृष्टी मदत मिळणार नाही.

आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी केली नसेल, म्हणजेच जे शेतकरी ई-पीक पाहणी न केल्यापासून नुकसान भरपाई, अनुदान इत्यादींपासून वंचित राहत होते. अश्या सर्व शेतकऱ्यांना सुध्दा अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत सरसकट मिळणार

अतिवृष्टी नुकसान भरपाई सोबतच आता लवकरच पीक विम्यासंदर्भात सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात मदत देण्यात येईल असे आश्वासनसुध्दा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

अतिवृष्टी नुकसान भरपाई जरी सरसकट मिळत असली, तरी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी

शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीसाठी तात्पुरत्या स्वरूपात शिथिलता देण्यात आलेली असली, तरी उर्वरित शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी.

हे सुध्दा वाचा : शेतकऱ्यांना महसुली निकाल आता QR Code द्वारे मिळणार !

कारण भविष्यकाळामध्ये शेती संदर्भातील इतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या शेतामध्ये पेरणी केलेल्या पिकाची नोंद करण्यासाठी व सातबाऱ्यावर पिकांची नोंद उतरवण्यासाठी ई-पीक पाहणी खूपच महत्त्वाची आहे.

ई-पीक पाहणी कशी करावी ? तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही खालील व्हिडिओ पाहून ई-पीक पाहणी करू शकता.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी संदर्भात दिलासा

शेतकऱ्यांना पिकविमा, अतिवृष्टी अनुदान मदत इत्यादी बाबतीत निकष करत असताना ई-पीक पाहणीची अडचण समोर येत होती. ही बाब लक्षात घेता मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक पाण्याची अट तात्पुरत्या स्वरूपात शिथिल केली आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा आता मदत दिली जाणार आहे.

See also  (एप्लीकेशन फॉर्म) महाराष्ट्र विधवा पेंशन योजना: ऑनलाइन आवेदन, रजिस्ट्रेशन व पात्रता