चंद्रयान 3 मिशन संपूर्ण माहिती समजून घ्या, प्रक्षेपण, एकूण खर्च, रितू करिधाल | Chandrayaan 3 Mission Information in Marathi

Chandrayaan 3 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत देशाच नाव उच्चांकित करण्यासाठी सतत नवनवीन उपग्रह अवकाशात पाठवण्यात येतात. आतापर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मार्फत मंगलयान, चंद्रयान 1, चंद्रयान 2 या विविध मोहिमा अंतराळ संशोधन संस्थाकडून पार पाडण्यात आलेल्या आहे; परंतु आपल्या देशातील तज्ञ संशोधक हताश न होता, यावरती सतत नवनवीन प्रयोग प्रयत्न करत राहतात. याचाच एक प्रयत्न म्हणून भारताने आता चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे.

चंद्रयान 3 मिशन काय आहे ? (What is Chandrayaan 3 Mission)

चंद्रयान 3 मिशन संदर्भात संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये चंद्रयान 3 कोणत्या तारखेला व कोणत्या वेळी लॉन्च करण्यात येईल ? यासाठी किती खर्च आला आहे ? LVM काय आहे ? चंद्रयान 3 यान चंद्रावर काय करणार ? इत्यादी बद्दलची संपूर्ण माहिती पाहुयात, त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Chandrayaan 3 Mission Overview

मोहीम प्रकारचंद्र लँडर, रोव्हर, प्रोपल्शन मॉड्यूल
ऑपरेटरभारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
संकेतस्थळwww.isro.gov.in
मिशन कालावधी14 दिवस
पेलोड वस्तुमानप्रोपल्शन मॉड्यूल 2148 किलो, लँडर मॉड्यूल (विक्रम) 1752 किलो रोव्हरसह 26 किलो एकूण 3900 किलो
शक्तीप्रोपल्शन मॉड्यूल: 758W लँडर: 738W, बायस रोव्हरसह WS: 50W
प्रक्षेपण तारीख14 जुलै 2023 2:35 वाजता
रॉकेटLVM3 M4
लाँच स्थानसतीश धवन अंतराळ केंद्र
कंत्राटदारISRO
स्पेसक्राफ्ट घटकरोव्हर
लँडिंग तारीख23 ऑगस्ट 2023
लँडिंग स्थान69.367621 S, 32.348126 E

भारतीय शास्त्रज्ञांकडून आता चंद्रयान 2 नंतर अजून एक मिशन मोहीम आखण्यात आलेली आहे, ती म्हणजे चंद्रयान 3 मिशन होय. या मिशन अंतर्गत भारत देश चंद्रावर चंद्रयान 3 उतरवणार असून चंद्रावर यान उतरवणारा भारत देश हा जगातील चौथा देश असणार आहे. याआधी चंद्रयानाच्या दोन मोहिमी झालेल्या आहेत; परंतु भारताला यामध्ये अपयश आले, त्यामुळे चंद्रयान 01 आणि चंद्रयान 02 नंतर भारताने परत एकदा नवीन मोहीम आखून चंद्रयान 3 प्रक्षेपित करण्याच धाडस धरल आहे.

See also  पूर्ण कर्ज परतफेड शेतकऱ्यांना 50,000 रु. लाभ | niyamit karj mafi 2022 anudan

चंद्रयानाचा आतापर्यंतचा इतिहास

चंद्रयान 3 अगोदर चंद्रयान 1 आणि 2 या चंद्रयानच्या मोहिमा भारताने पार पडल्या आहेत; परंतु दुर्दैवाने भारताला यामध्ये अपयश आलं. चंद्रयानाची पहिली मोहीम 22 ऑक्टोबर 2008 रोजी यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली होती. त्यानंतर तब्बल अकरा वर्षांनी म्हणजेच दिनांक 22 जुलै 2019 रोजी पुन्हा एकदा भारताने धाडस दाखवत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचे नियोजन केले; परंतु दुर्दैवाने काही सेकंदातच चंद्रयान 2 चा संपर्क तुटला, त्यामुळे चंद्रयान 2 मिशनसुद्धा अयशस्वी झाले. परंतु चंद्रयान 2 अपुरी काम पूर्ण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने चंद्रयान 3 तयार केलेले, असून ही मोहीम लवकरच पार पडली जाणार आहे.

ISRO Chandrayaan 1,2,3 All Mission Launch Dates

Chandrayaan 1 Mission Launch Date22 October 2008
Chandrayaan 2 Mission Launch Date22 july 2019
Chandrayaan 3 Mission Launch Date14 july 2023

Chandrayaan 2 आणि Chandrayaan 3 मधील फरक (Difference)

चंद्रयान 2 मोहीम चंद्रयान 1 नंतरची भारतातील दुसरी चंद्रावरची मोहीम होती ती यशस्वी ठरली होती. त्यानंतर 22 जुलै 2019 रोजी दुसऱ्या चंद्रयानचे प्रक्षेपण करण्यात आले; परंतु चंद्रयान 2 मध्ये लँडर आणि रोवर ज्या तांत्रिक अडचणीमुळे चंद्रयान 2 चे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. चंद्रयान 2 विक्रम ब्लेंडर अलगद उतरण्याऐवजी चंद्रावर एकदम कोसळला, त्यामुळे चंद्रयान 2 अयशस्वी झाला. यामधील त्रुटी दूर करून चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे उतरण्यास मदत होईल असे बदल चांद्रयान 3 मध्ये करण्यात आले आहेत.

Chandrayaan 3 मुख्य उद्देश (Purpose & Objectives)

चंद्रयान 3 ची मुख्य तीन उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेली आहेत. यापूर्वी चंद्रयान 2 लेंडरची प्राथमिक उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि रोबोटिक रोव्हर चालवण्याची क्षमता प्रदर्शित करणे होते. ऑर्बटरची वैज्ञानिक वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत.

  • चंद्राची स्थलाकृती, खनिजशास्त्र, मौलिक विपुलता, चंद्राचा बाहेरील मंडळ त्याचप्रमाणे चंद्रावर हायड्रोक्झिल व पाण्याच्या बर्फाच्या खुणांचा अभ्यास करणे.
  • दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील राष्ट्रभागावरील पाण्याच्या बर्फाची जाडी त्याचप्रमाणे चंद्राच्या रेगोलिथचा अभ्यास करणे.
  • चंद्राच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करणे आणि त्यांची 3D नकाश तयार करण्यास मदत करणे.
See also  माझी कन्या भाग्यश्री योजना 2021: Majhi Bhagyashree Kanya Yojana Form

चंद्रयान 3 केव्हा लॉन्च होणार ? (Chandrayaan 3 Launch Date)

चंद्रयान 3 चं प्रक्षेपण म्हणजेच लॉन्च होण्याची तारीख 14 जुलै 2023 असून त्या दिवशी शुक्रवार वेळ 2:35 PM वाजता श्रीहरीकोटा येथून Chandrayaan-3 Launch केलं जाणार आहे, अशी माहिती ISRO चे अध्यक्ष “एम सोमनाथ” यांनी दिली. “एम सोमनाथ” यांच्या सांगण्यावरून 13 ते 19 जुलै यादरम्यान चंद्रयान 3 प्रक्षेपित करण्याची शक्यता आहे. चंद्रयान-3 प्रक्षेपित केल्यानंतर उपग्रहावार 23 ऑगस्ट 2023 रोजी लँड होईल.

एलव्हीएम (LVM) 3 काय आहे ? (LVM in Marathi)

एलव्हीएम (LVM) 3 हा इसरो चा अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रेक्षपण यान आहे. चंद्रयान 3 मध्ये LVM-3 या यालाचा उपयोग केला जाणार आहे. चंद्रयान 3 या यानात रोव्हर, लेंडर आणि पॉप्युलेशन मॉडुल असल्यामुळे त्यांना स्वतः अंतराळात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे LVM-3 हा यान चंद्रयान 3 सोबत जोडण्यात आलेला आहे. याच मुख्य कारण म्हणजे चंद्रयान 3 मध्ये पुढे ढकलण्याची क्षमता असते, ज्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होऊन उपग्रहासारख्या जड वस्तूला अवकाशात उचलण्यासाठी लागणारी महत्त्वाची ऊर्जा LMV-3 हे यान तयार करू शकत, म्हणूनच चंद्रयान 3 सोबत LVM-3 यान जोडण्यात आलं आहे.

LMV-3 ची उंची 43.50 मीटर उंच इतकी आहे. तर याचे एकूण वजन 640 टन आहे. LMV-3 मध्ये 8 ते 9 हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे. भारतातील सर्वाधिक वजन असणारा प्रक्षेपण यान म्हणून LMV ची ओळख आहे. याची पहिली चाचणी 2019 मध्ये करण्यात आलेली होती.

चंद्रयान 3 मोहीमच एकूण खर्च ? (Total Budget & Expense For Chandrayaan 3)

चंद्रयान 3 या मोहिमेचा एकंदरीत आतापर्यंतचा खर्च (Budget) 615 कोटी रु. इतका आहे. या खर्चाच्या बजेटचा विचार केला तर इतर देशांच्या तुलनेत चंद्रयान मोहिमेसाठी हा खर्च खूपच कमी मानला जात आहे. यामुळे हे सिद्ध होतं की, ISRO ही अवकाश संशोधन संस्था खूपच कमी बजेटमध्ये मोठी कामगिरी करत आहे.

See also  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना : गरिबांना आणखी 3 महिने मिळणार मोफत धान्य! | mofat ration yojana update

रितू करिधाल कोण आहेत ? (Ritu Karidhal information in marathi)

डॉ. रितू करिधाल श्रीवास्तव या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये कार्यरत असून त्यांचा जन्म 13 एप्रिल 1975 रोजी लखनऊ (उत्तर प्रदेश) मध्ये झाला असून, त्यां एरोस्पेस इंजिनियर आहेत व त्यांना रॉकेट वुमन म्हणून ओळखल जात. त्यांच्या पतीचे नाव अविनाश श्रीवास्तव असून या दांपत्याला दोन मुलं आहेत ज्यांचे नाव आदित्य आणि अनिशा असं आहे. 2007 मध्ये डॉ. रितू करिधाल यांना राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यामार्फत इस्रो यंग सायंटिस्ट आवड मिळाला आहे. मंगळयानाच्या अभियानामध्ये डॉ. रितू करिधाल उप-ऑपरेशन डायरेक्टर होत्या.

चंद्रयान 3 चे मुख्य उद्देश काय ? (Purpose of Chandrayaan 3 Mission)

चंद्रयान 3 चे मुख्य उद्देश लॅन्डरला चंद्रावर सुरक्षितपणे हा होय.

चंद्रयान 3 कधी लॉन्च होणार आहे ? (Chandrayaan 3 Launch Date in Marathi)

13 ते 19 जुलै पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.

चंद्रयान 3 कुठे उतरणार आहे ? (Chandryaan 3 Landing Space Location)

चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार.

LVM चा फुलफॉर्म काय आहे ? (Full Form of LVM)

LVM चा फुलफॉर्म लॉन्च व्हेईकल मार्क असा होतो.

चंद्रयान 3 चा एकूण खर्च किती आहे ? (Total Budget Expense)

चंद्रयान 3 चा एकूण खर्च 615 कोटी इतका आहे.

चंद्रयान 3 कधी व किती वाजता लॉन्च होणार आहे ?

चंद्रयान 3 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 ला लॉन्च होणार आहे.